कारंजा येथील ट्रामा केअर सेंटर मधील लिफ्ट ( उद् वाहक ) व रॅम्प अखेर पूर्णत्वास

Sun 15-Dec-2024,10:32 PM IST -07:00
Beach Activities

  नागरी समस्या संघर्ष समितीच्या संघर्षाला आले यश

कारंजा (घा) स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील दोन मजली ट्रॉमा केअर सेंटर मध्ये बऱ्याच प्रतीक्षेनंतर लिफ्ट( उद्ववाहक) व रॅम्पचे बांधकाम पूर्ण होऊन सुरू झाल्यामुळे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने समाधान व्यक्त केले आहे.

चार वर्षांपूर्वी कोरोना कालखंडात तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या कारंजा दौऱ्या दरम्यान त्यांच्याकडे कारंजा नागरी समस्या संघाच्या समितीने ट्रामा केअर सेंटर मध्ये लिफ्टची व रॅम्प ची मागणी केली होती. कारण रुग्णालयाच्या परिसरात ट्रॉमा केअर ची दोन मजली इमारत बांधण्यात आली होती. व ड्रामा केअर युनिट सुरू पण झाले होते. परंतु विना रॅम आणि लिफ्ट शिवाय ट्रामा केअरची इमारत पूर्णत्वास गेली कशी ? असा गंभीर आणि वास्तव प्रश्न कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला होता व मागणी केली होती.त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयाला भेट देऊन वस्तुस्थिती समजून घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन रॅम्प करीता निधीची तरतूद करून दिली होती. त्यामुळे मागील वर्षी रॅम्प तयार होऊन उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना( सर्वसाधारण) सन 2022- 23 अंतर्गत कामामध्ये ३५ लाख रुपयाचा खर्च करून ट्रामा केअर च्या दोन मजली इमारतीमध्ये पंधरा पॅसेंजरसह स्ट्रेचर या क्षमतेची लिफ्ट रुग्णांकरता सुरू झाली आहे. त्यामुळे आता ट्रामा केअर मधील पेशंटची स्ट्रेचरसह लिफ्ट द्वारे वरच्या मजल्यावर ने - आण होऊ शकते.

 समस्या सुटल्यामुळे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने समाधान व्यक्त करीत असल्याचे कळविले आहे.