बिना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यावर वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई

Thu 19-Dec-2024,08:20 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन मदत मुत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वरांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे . दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ अन्वये सक्तीचे आहे. जिल्हात जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत दुचाकीचे एकुण ३८४ अपघात झाले.असून त्यात १९४ नागरीकांचा मूत्यु झाला आहे.त्यापैकी १६६ दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहेत.हेल्मेटबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक धोरण अवलंबले असुन चंद्रपूर पोलिस दलाच्यवतीने हेल्मेट न परीधान करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्याचा उद्देश अपघातामध्ये मूत्युदराचे प्रमाण कमी करणे हे आहे.१० ते १७ डिसेंबर २०२४ या कालावधीत वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर व सर्व पोलीस स्टेशनतर्फे हेल्मेटबाबत विशेष मोहिम राबवून ४ हजार ३०० विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे ३ हजार ४९३ तर पोलीस स्टेशनतर्फे ८०७ विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. १७ डिसेंबर २०२४ ला विसापुर येथील टोलनाक्याजवळ वाहतुक शाखेतर्फे एकुण १ हजार ९७ विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

बरेचसे नागरीक हे हेल्मेट परीधान न करता दुचाकी चालवितात. त्यामुळे मोठया प्रमाणात अपघात होतात. नागरीकांच्या सुरक्षेकरीता सदर मोहिम संपुर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे. तरी, नागरीकांनी यापुढे दुचाकी चालवितांना हेल्मेट परीधान करावे. जिल्हयातील वाढते अपघाताचे प्रमाण पाहता सर्व वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी केले आहे.