श्रीमद भागवत अखंड ज्ञान यज्ञ सप्ताह १२ डिसें.पासुन

Fri 13-Dec-2024,10:02 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी उज्वल पाटील मोवाड 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वंदनीय भाकरे महाराज चांदनी बर्डी यांचे कृपाप्रसादाने ह.भ.प. ठाकरे महाराज यांच्या आशीर्वादाने बालमुर्ती अनुसया माता देवस्थान मोवाड येथे दी १२ डीसेंबर पासुन ते १९ डिसें.पर्यंत श्रीमद भागवत अखंड ज्ञान यज्ञ हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सातही दीवसाकरीता भागवत प्रवक्ते म्हणुन ह.भ.प. बारई महाराज , मु. सावरगाव हे उपस्थीत राहणार असुन ह.भ.प. संजय महाराज कडु मु. मोरचुंद यांचे सुमधुर गायनाने भागताची संगीतमय सुरूवात होणार असल्याचे देवस्थान भजन मंडळाचे सदस्य गायक रूपेश दुहीजोड यांनी कळवीले.सातही दीवसासाठी दैनंदीन कार्यक्रमात सकाळी ५ ते ७ काकडा आरती,सकाळी ९ ते ११ श्री गुरू चरीत्र पारायण, दुपारी३ ते ७ पर्यंत श्रीमद भागवत प्रवचन नंतर सायंकाळी ७ ते ८ पर्यंत हरीपाठ ठेवण्यात आला आहे.तसेच सातही दीवसासाठी सायंकाळी ९ ते ११ दैनीक हरीकीर्तने व भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी उपस्थीती म्हणुनृ सावता भजन मोवाड,जगदंबा हरीपाठ भजन मंडळ,दुर्गा भजन मंडळ,अन्नपुर्णा महीला भजन मंडळ,नागद्वार स्वामी महीला भजन मंडळ,रसीका भजन मंडळ,तसेच रणचंडीका महीला भजन मंडळ मोवाड यांची प्रामुख्याने उपस्थीती राहणार आहे. ता. १९ ला सकाळी ११ ते २ पर्यंत ह.भ.प. ईश्वर महाराज उइके यांचे हस्ते गोपाल काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.या सप्ताहासाठी सातही दीवस स्वेच्छेने सेवा देणारी भजन मंडळी रामकृष्ण मेंढे खैरगाव, सुनील देवघरे,धनराजजी देवघरे,गणपती कनीरे खैरगाव,महेश सातपूते, नैनदास सुर्यवंशी,बाबुराव दुहीजोड,जगदीश खराळकर,पांडुरंग वाघे,मनोहर धांदल,सुभाषराव दारोकर,केशवराव कळंबे,सुरेश कडु,ओम प्रकाश कठाणे तसेच शिक्षक साहेबरा ढोके यांची या भागवत सप्ताहात मोलाची सेवा लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त भावीकांनी भागवत श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात येत आहे.