केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान प्रकरणी आमगाव तालुका काँग्रेस तर्फे जाहीर निषेध

Sat 21-Dec-2024,05:19 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगांव

गोंदिया:आमगांव येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खासदारकी रद्द करण्याबाबत चे आमगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व निदर्शने करत तहसीलदार यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन देण्यात आले.आमगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संजय बहेकार यांच्या नेतृत्वात निवेदन देतेवेळी आमगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बेहकार,अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष रामेश्वर श्यामकुवर, तालुका महासचिव राधाकिसन चुटे,तालुका उपाध्यक्ष पिंकेश शेंडे, ओबीसी विभागाचे तालुका उपाध्यक्ष रितेश चुटे यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांच्या मार्फत यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले निवेदनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिनाक 17/12/2024 रोजी राज्यसभा मध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अवमान जनक वक्तव्य केल्या बाबत जाहीर निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खासदारकी रद्द करून जीवनभर निवडणूक लढविण्याची बंदी घालण्यात यावी तसेच देशवासियांशी माफी मागावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली मागण्यांचे तत्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते