महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Fri 06-Dec-2024,08:38 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपुर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते एक महान तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि मानवतेचे खरे सेवक होते. त्यांनी शिक्षण, समानता, आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांनी कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले. संघर्षातून समाजाला विषमतेच्या विळख्यातून मुक्त करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाला अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रेरणादायी संघर्षाची गाथा म्हणता येईल, असे विधान आ. किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे आ. किशोर जोरगेवार यांनी मुख्य रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाला भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोडूवार, भाजप नेते दशरथसिंह ठाकुर, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, विमल कातकर, निलिमा वनकर, अमोल शेंडे, नकुल वासमवार, आशा देशमुख, सुमित बेले, स्वप्नील पटकोटवार, चंद्रशेखर देशमुख, हेरमन जोसेफ, डॉ. सत्यजित पोद्दार, विनोद अनंतवार, छाया चवरे, सुरेंद्र अंचल, संजय महाकालीवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.