परभणी संविधान अवमान प्रकरणात आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करावी

Wed 18-Dec-2024,08:14 PM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बक्श ( हिंगणघाट ) 

 

 

परभणी संविधान अवमान प्रकरणात आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करावी. व हा नियोजित कट आहे याच्या मागचा मूळ सूत्रधार पोलिसांनी शोधावा व न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू पावलेले भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला १ करोड रुपये क्षतिपूर्ति मिळण्यात यावे.

 परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची समाज कंटकाने तोडफोड करून विटंबना केल्याच्या व न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू पावलेले भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट तालुका व शहर कमेटी ने हिंगणघाट बंद चे आव्हान केले होते परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात शांती व सुव्यवस्था राहण्याच्या उद्देशाने हा बंद मागे घेण्यात आला व लोकशाही पद्धतीने मान.ना. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, अधिवेशन नागपूर, मार्फत- उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांना निवेदन सादर केले. 

परभणीत जातीयवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्ह आहे.

संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल...हातावर हात देऊन बसल्याने संविधान शाबूत राहणार नाही. त्यासाठी प्रचंड उर्जेने कार्यरत होण्याची गरज आहे....!! 

निवेदना मध्ये-

१)संबंधित आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करावी.

२) हा नियोजित कट आहे याच्या मागचा मूळ सूत्रधार पोलिसांनी शोधावा.

३) न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू पावलेले भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला १ करोड रुपये क्षतिपूर्ति मिळण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या...

वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट तालुका व शहर , सावित्री च्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट हिंगणघाट, व आंबेडकरी विविध सामाजिक समविचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले..

निवेदनावर- विवेक कांबळे, रवि कांबळे,अशोक रामटेके,मंगलाताई कांबळे, सीमाताई मेश्राम,प्रलय तेलंग,आतिश दिवे, सिद्धार्थ जामनकर, अश्वजीत भगत,लोमेश बोबडे,अतुल मेंढे, रसपाल शेंद्रे,आनंद जनबंधू, रिंकु भालेराव, विक्की कांबळे, विक्की गायकवाड़, कुणाल गेडाम ,गोलू वासे ,राहुल हटवार ,जमीर पठान ,सूरज शेंडे ,संकेत धबर्डे ,विशाल कांबळे, इत्यादी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.