बल्लारपूर पोलिसांची कारवाई,जुगार अड्डयावर धाड 7 आरोपीना अटक तर 1 फरार

Wed 18-Dec-2024,09:18 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वॉर्ड येथे घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून ७ आरोपींना अटक केले असून १ जण फरार झाला आहे. त्यांचा जवळून ५२ पत्ते सहित २ हजार ४८० रुपये जप्त केले. १७ डिसेंबर ला रात्री ८ वाजता मिलिंद चौक, बल्लारपुर येथिल परचाके यांच्या घरी काही ईसम पैसे लावुन ५२ तास पत्यावर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहीती डी बी पथकाला मिळाली. त्यावरून डी बी पथकांनी मिलिंद चौक, मौलाना आझाद वॉर्ड येथे परचाके याचा घरी धडक देत आरोपी विकास अशोक पिंपळकर (३४) रा. मौलाना आझाद वार्ड बल्लारपुर, भिमराव सिताराम करमणकर (५०) रा. विद्यानगर वार्ड बल्लारपुर, सुरेश सुखलाल कैथवास (४५) रा. गडी ता. जि. अकोला ह.मु. मौलाना आझाद वार्ड बल्लारपुर, अतुल बाबुराव गेडाम (४३) रा. मौलाना आझाद वार्ड बल्लारपुर, विलास शंकर वानखेडे (४५) रा. मौलाना आझाद वार्ड बल्लारपुर, दुर्वेन्द चंदु भोगले (३४) रा. मौलाना आझार्ड वार्ड बल्लरपुर, दिनेश मारोती परचाके (४०) रा. मौलाना आझाद वार्ड बल्लारपुर यांना अटक केले तर प्रशांत किशोर मांडवगडे रा. मौलाना आझाद वॉर्ड, बल्लारपूर हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला. पोलीसांनी आरोपी विरुध्द कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.आर.टोपले, पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा,स फौ आंनद परचाके पोहवा सुनिल कामतकर पोहवा पुरुशोत्तम चिकाटे,पोअ विकास जुमनाके,पोअ खंडेराव माने,पोअ लखन चच्हाण,मपोअ कविता नायडू यांनी केले.पुढील तपास पोलीस हवालदार सुनील कामटकर करीत आहे.