गोंडपिपरी येथे कारच्या धडकेत मुलीचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी

Fri 13-Dec-2024,02:32 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपीपरी येथील पंचायत समिती समोर चंद्रपूरहुन आष्टिच्या दिशेने जाणाऱ्या कारने पायी रस्ता ओलांडणाऱ्या बाप-लेकीला धडक दिली.या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.जिथे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद गोंडपीपरी पोलिसांनी ११ डिसेंबर ला रात्री १० वाजता केली आहे. मिळाल्येल्या माहितीनुसार,चंद्रपूरच्या बालाजी वार्डात राहणारे उज्ज्वल प्रभाकर सोनटक्के (४२) हे स्विफ्ट डिझायर कार क्रं एमएच ३४ बिवी ५९३० ने आष्टिच्या दिशेने जात होते.११ डिसेंबर रोजी दुपारी १:१५ वाजता कार गोंडपिपरी येथील पंचायत समिती समोरील गंगामाता झेरॉक्स सेंटरजवळ येताच कान्हळगाव येथील रहिवासी जेतू संपत मरकाम (४५) आणि त्यांची मुलगी शालिनी जेतू मरकाम (१८) पायी रस्ता ओलांडत असताना कारने जोरदार धडक दिली. या घटनेत वडील व मुलगी गंभीर जखमी झाले.घटनेच्या माहितीच्या आधारे गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मरापे हे त्यांच्या पथकासह पोहोचले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दोघांनाही गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.जेथे उपचारादरम्यान मुलगी शालिनीचा मृत्यू झाल्याची माहिती मृताची आई गंगूबाई जेतू मरकाम (३५) यांनी दिली. या आधारे गोंडपिपरी पोलिसांनी कार चालक उज्ज्वल प्रभाकर सोनटक्के (४२), रा. बालाजी वॉर्ड चंद्रपूर याच्याविरुद्ध भादंवि कलम १८५,१०६(१), १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा १९८८ नुसार २८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी कार चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता आरोपीने दारू प्राशन केल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा पुढील तपास गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे करीत आहेत.