दोन तलवार सहित एका आरोपीला अटक : बल्लारपूर पोलिसांची कारवाई
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर पोलीसांनी आज गुप्त माहिती चे आधारे एका आरोपीला दोन तलवार सहित अटक केले.आज १४ डिसेंबर ला बल्लारपूर पोलीस स्टेशन चे डी बी पथक चे अधिकारी व कर्मचारी शहरात अवैध धंद्यावर रेड करण्याकरिता तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरिता वस्ती विभागात गस्त करत असताना त्यांना गुप्त माहिती भगत सिंह वॉर्ड मध्ये कमल रामचंद्र वर्मा (२१) युवक लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देश्याने घरी तलवार लपवून ठेवले आहे.पोलीसांनी त्याचे घर गाठत घराची झडती घेतली असता दोन तलवार मिळून आले. पोलीसांनी आरोपी कमल रामचंद्र वर्मा याला अटक करून कलम २५, ४ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.सदर कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील गाडे याचा नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक ए.एस.टोपले,पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा,सफौ गजानन डोईफोडे,सफौ आनंद परचाके,पोलिस हवालदार सत्यवान कोटनाके,रणविजय ठाकुर,सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे,संतोष दंडेवार,संतोष पंडित,पोलिस अंमलदार विकास जुमनाके,शरदचंद्र कारुष,वरिष्ठ रंगारी,शेखर माथनकर,लखन चौहान,खंडेराव माने,मिलिंद आत्राम,भुषण टोंगे,भास्कर चिचवलकर, महिला पोलिस अनिता नायडू आदिंनी केले आहे.