वायगाव येथे जयहिंद सामाजिक संघटनेची स्थापना,रक्तदान हेच श्रेष्ठदानपासून सुरुवात
प्रतिनिधी = पवन ढोके वरोरा
भद्रावती तालूक्यातील वायगाव येथे सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित "जय हिंद" या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य धानोरकर जगन्नाथबाबा विद्यालय हे होते तसेच संघटनेच्या या समारंभाला स्थानिक मंडळी,सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक ,विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक,श्रीगुरुदेव सेवा मंडळ, महिला बचत गट,ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच बाहेर गावावरून आलेले ज्यांना ग्रामोद्धाराची आत्मीयता असलेले गावाचे भूमिपुत्र उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविकातून विशाल कुरेकार यांनी जयहिंद संघटनेच्या उभारणीत योगदान देणाऱ्यांचा चांगुलपणा व सामाजिक परिवर्तन दीपस्तंभ ठरणारा आहे असे विचार मांडले, कार्यक्रमाध्यक्ष धानोरकर यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन संघटनेच्या कार्याला हातभार लावावा,सदस्यांनी आपले ज्ञान,अनुभव व सहकार्य द्यावे असे विचार मांडले,संचालन मंगेश मेश्राम व शामदेव काकडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी "रक्तदान-श्रेष्ठदान" हा पहिलाच यशस्वी उपक्रम रबावण्यात आला.सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र,भेटवस्तू आणि फळवाटप करण्यात आली या संघटनेच्या स्थापनेसाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घेतला.