इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये विद्यार्थ्यांचे सुयश

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा तालुक्यातील कावराबांध येथे दिनांक 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय नुकतीच इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेण्यात आली होती. या कॉन्फरन्स मध्ये पोस्टर प्रझेंटेशन साठी संपूर्ण देशांमधून विविध विद्यार्थ्यांनी आपल्या रिसर्च संबंधित व प्रोजेक्ट संबंधित पोस्टर प्रेझेंटेशन केले होते. त्यामध्ये शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालयाची एम. एस.सी. (प्राणीशास्त्र) द्वितीय वर्षात शिकणारी विद्यार्थिनी कु. स्नेहरीका राजेश पटले हिने "स्टडी ऑफ फ्रोग्ज अँड टोड्स फ्रॉम सालेकसा तहसील डिस्ट्रिक्ट गोंदिया" या प्रोजेक्टच्या विषयावर आपले प्रेझेंटेशन सादर केले होते. त्यामध्ये तिला बेस्ट प्रझेंटर म्हणून गौरविण्यात आले. तसेच त्याच वर्गातील दुसरी विद्यार्थिनी कुमारी आरती पटले हिने "स्टडी ऑफ ओडोनेटा फ्रॉम सालेकसा तहसील डिस्ट्रिक्ट गोंदिया" या विषयावर प्रेझेंटेशन सादर केले होते त्याही विद्यार्थिनीला बेस्ट प्रझेंटर म्हणून गौरविण्यात आले. दोन्हीही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक डॉ.संतोष पुरी आणि डॉ.पूनम ठाकूर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.नारायण मूर्ती यांना दिले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.