पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर लोकप्रतिनिधी सह वरिष्ठांचे दुर्लक्ष 92 गावांच् अतिरिक्त कार्यभार एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
गोंदिया जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षापासून पशुवैद्यकीय दवाखाना आहे राम भरोसे झाले आहे त्यामुळे येथील पशु जनावरांना वेळेवर उपचार मिळत नाही त्यामुळे पशुवैद्यकीय व इतर शासकीय योजना पासून लाभार्थी वंचित झाले आहेत विशेष म्हणजे सन 2022 मध्ये शासनाकडून मराठवाडा पॅकेज करिता अर्ज मागविण्यात आले होते व त्यामध्ये मराठवाडा योजनेत लाभार्थ्यांची निवड झाली आहे परंतु गेल्या दोन ते तीन वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही यादी प्रकाशित न करता व मंजूर यादी ला लाभार्थ्यांना योजना न देता ही यादी आजही फाईल धुळखात आहे त्यामुळे लाभार्थी यांना शासकीय योजनांच् लाभ मिळत आहे की नाही ही सुद्धा लाभार्थ्याला माहित नाही गोंदिया जिल्ह्यासह सालेकसा तालुक्यात जवळपास 41 ग्रामपंचायत समावेश असून 92 गावे या तालुक्यात मोडत आहे व सदर 92 गावे एकाच अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकारी असून सालेकशाचे पशुवैद्यकीय अधिकारी हे आमगाव वरून अपडाऊन करत असतात त्यांचे अधिनस्त असलेले कर्मचारी सुद्धा मुख्यालय राहत नसून ते बाहेर गावावरून येजा करीत असल्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाने हे सुखसुकाट व मोकाट पडले आहे तालुका नक्षलग्रस्त क्षेत्र परंतु आजही पशुवैद्यकीय अधिकारी हे दवाखान्यात उशिरा येणे व तीन ते चार वाजे दवाखान्यात निघून जाणे ही त्यांची सवय झालेली आहेत.गोंदिया जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रिक्त जागा असल्यामुळे अतिरिक्त कार्यभार असणाऱ्यांना मोठे तारेवरची कसरत करावी लागत आहे बऱ्याच अधिकाऱ्यांना एक ते दोन जागेच् अतिरिक्त कार्यभार सोपविला गेल्यामुळे शासनाच् योजना पासून बरेच लाभार्थी वंचित आहेत सात ते आठ दवाखाने आहेत परंतु त्यापैकी साखरीटोला पिपरीया इथे देखील दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी आहेत मात्र गोरे,कोटरा, कावराबांध,विचारपूर पांढरवाणी, सालेकसा या ठिकाणी देखील पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे येथील नागरिकांना लसीकरण करताना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे जनावरांना सुद्धा वेळेवर उपचार मिळत नाही साले कसाची अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकारी जर मुख्यालयात राहत नसेल तर उर्वरित अधिकाऱ्यांनी कसे का मुख्यालय राहावे असा संतप्त सवाल ही नागरिकांकडून केला जात आहे.संबंधित ज्यांना लोकप्रतिनिधीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सालेगाव येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी देण्यात यावे व मराठवाडा योजनेच्या लाभार्थी यांना त्वरित योजना वाटप करण्यात यावी अशी मागणीही होत आहे.
प्रतिक्रिया
गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाने मराठवाडा पॅकेज योजना काढली आहे व बऱ्याच लाभार्थ्यांना मराठवाडा यादीमध्ये समाविष्ट केले व त्यांना योजना दिली जाणार आहे शासनाने 5 कोटी 25 लाख दिले यामध्ये मात्र आतापर्यंत 48 लाख खर्च झालेले नाही एकूण जिल्ह्यात लाभार्थी 743 उर्वरित असून त्यांना 31 मार्च 2025 पर्यंत मराठवाडा योजनेच् लाभ दिला जाईल.डॉ.जालिंदर ट्रीटमे उपायुक्त पशुवैद्यकीय पशुसंवर्धन विभाग जिल्हा कार्यालय गोंदिया