अखेर केपीसीएल कोळसा खदान बंद वाहतूक सेने ला यश वनविभाग अखेर नरमले

प्रतिनिधी :- शारुखखान पठान वरोरा
भद्रावती - वरोरा :- भद्रावती तालुक्यातील चंद्रपूर नागपूर हायवे लगतच असलेल्या बरांज मोकासा या गावातील आजूबाजूच्या जमिनी कर्नाटक एमटा कोळसा खदानिने या परिसरातील हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित करून या जमिनीवर कोळशाचे उत्खनन सुरू केले . या परिसरात वनविभागाचा खूप मोठा भाग या खदानीच्या क्षेत्रात येत असल्याने या कंपनीला वनविभागाची रीतसर परवानगी घेऊन या जमिनीची रॉयल्टी सरकार जमा करावी लागते. मात्र तिला काही दिवसांपासून वनविभागाची कोणतीही परवानगी नसल्याने खदान मालका द्वारा या जमिनीतून अवैधरित्या कोळशाचे उत्खनन सुरू होते.या अवैध उत्खनाविरोधात शिवराज्य वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख गुलाम गौस सिद्दिकी यांनी विरोध दर्शविल्याने अखेर ती कोळसा खान बंद झाली.
केपीसीएल कंपनीला 84.41 हेक्टर वन जमीन देतांना बरांज मोकासा चेक बरांज गावाचे पुनर्वसन वस्तीच्या जागेला बाधा पोचणार नाही. अशा अटी व शर्तीवर ती जमीन देण्यात आली. मात्र केपीसीएल कंपनीने या अटी व शर्तीचा भंग करून अवैध उत्खनन सुरू केल्याने या जागेवरन आतापावतो 80 ते 90 मॅट्रिक टन कोळसा उत्खनन केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांनी कोळसा उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा केला व तो अहवाल वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला होता. तरीही 3 मार्च ते 5 मार्च पर्यंत कोळसा उत्खनन करण्याची परवानगी दिली होती.ती परवानगी दि. 5 मार्चला संपली असतानाही केपीसीएल द्वारा वनविभागाच्या परिक्षेत्रात अविरत उत्खनन सुरू होते.या प्रकाराला आळा बसण्यासाठी शिवराज्य वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाम गौस सिद्दिकी यांनी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत खाडे यांना विचारणा केली असता.त्यांनी या प्रकारावर कोणतीही समाधानकारक उत्तर दिलेले नाही.एवढेच नव्हे तर भद्रावती वनपरिक्षेत्राचे अधिकारी धानकाटे यांनीही वनविभागाच्या वरिष्ठाकडून तीन दिवसाचा अवधी दिल्याचे सांगितले होते. त्या सर्व प्रकारावर शिवराज्य वाहतूक सेनेचे पदाधिकारी यांनी केपीसीएलच्या परिसरात जाऊन याबाबत विचारणा केली असता वन विभागाने नमते घेत अखेर केपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना खदान बंद करण्याची नोटीस दिली. यावेळी शिवराज्य वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाम गौस सिद्दिकी, शिवराज्य वाहतूक सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष इरफान शेख,जिल्हा उपाध्यक्ष राहुल कुशवा, वरोरा तालुकाध्यक्ष भोजराज खडसे, मयूर गेडाम भीम आर्मी संविधान रक्षक संघ, सरकार शेख, आदिल खान, सचिन सोनवणे, सुमित रामटेके, मयूर शेंडे, हिमालय मडावी, करण मनेकर, विक्की वानखेडे, प्रणय कीर्तने, नितीन जोगी, आशुतोस चिलमवार यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.