संतोष कुमार राय बल्लारशाह रेल्वे आरपीएफ चे नवीन निरीक्षक

Thu 03-Apr-2025,09:36 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानक अतिशय वर्दळीचे असून मिनी भारत म्हणून क्रमांक एकचे स्थानक म्हणून ओळखले जाते. बल्लारशाह आरपीएफ निरीक्षक म्हणून तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर सुनीलकुमार पाठक यांची मुंबईच्या मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी नाशिकचे नवे निरीक्षक संतोषकुमार राय यांनी पदभार स्वीकारला आहे. बल्लारशाह स्थानकातून दररोज सुमारे पंचेचाळीस प्रवाशी गाड्या येतात. प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तेलंगणा राज्यानंतरचे पहिले जंक्शन बल्लारशाह आहे. सुनील कुमार पाठक आज मुंबईला रवाना झाले आहेत, तर संतोष कुमार राय यांनी त्यांची खुर्ची सांभाळली आहे.