वरोरा शहरात पोलिसांचा रूटमार्च

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा
वरोरा:- नागपूर येथे दि.17 मार्च रोजी घडलेल्या घटनेवरून वरोरा शहरात कायदा सुव्यवस्थेसाठी दिनांक 22 मार्च ला सायंकाळी 6 वाजता वरोरा पोलिसांनकडून रूटमार्च काढण्यात आला.नागपूर येथे घडलेल्या घटना संदर्भात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच आगामी विविध धर्मीय यांचे सण उत्सव निमित्ताने वरोरा शहारा मध्ये रूट मार्च घेण्यात आला.सदर रूटमार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पद्मावार चौक ते डोंगरवार चौक ते मित्र चौक हे कामगार चौक ते नेहरू चौक ते कच्छी मस्जिद ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा काढण्यात आला.या रूटमार्च मध्ये पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे,ए.पी.आय.अनिल मेश्राम,शरद भस्मे, यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.