विधानसभेत गडचिरौली जिल्हा तिल विविध प्रश्नांबाबत माननीय आमदार रामदाजी मसराम यांनी सरकारचे लक्ष वेधले

Sat 22-Mar-2025,03:07 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी :२० मार्च २०२५ रोजी, विधानसभेत गडचिरौली जिल्हा तिल विविध प्रश्नांबाबत माननीय आमदार रामदाजी मसराम यांनी सरकारचे लक्ष वेधले त्यांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांवर चर्चा केली आणि सरकारकडून त्वरित पावले उचलण्याची मागणी केली.आमदार रामदासजी मसराम यांनी विशेषतः पायाभूत सुविधा,संबंधित समस्यांवर भर दिला. त्यांनी सरकारकडून या क्षेत्रांमध्ये अधिक निधी आणि संसाधने उपलब्ध करून देण्याची विनंती केली. 1)गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरवस्था झाली आहे 2)शेतकऱ्यांचा कर्ज माफ झालं पाहिजे यासाठी त्यानी हा महत्वाचा मुद्दा मांडला की माझ्या जिल्ह्यात अनेक बेरोजगार तरुण आहेत 3)गडचिरोली जिल्ह्या हा जसा उद्योग विरहित जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये एकमेव व्यवसाय म्हणजे शेती आहे आणि त्याचा विद्युत पुरवठा आणि सिंचनाची सोयी हें होणे अत्यंत आवश्यक आहे. 4)परंतु माझ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रात अनेक नद्या नाल्या वाहत असतात.पण ते पूर्ण पावसाचं पाणी निघून जात असत आणि त्याला अडवण्यासाठी कसल्याही प्रकारचं यंत्रणा उभी झाली नाही आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी पाणी अडवा पाणी जिरवा बंधाऱ्यांची अत्यन्त गरज आहे. 5)आणि शेतामध्ये जे पीक आहे धानाच पीक मक्याच पीक याचठिकानी मोठ्या प्रमाणात चांगलं पीक असताना शेतीला विद्युत पुरवठा नसल्यामूळे आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच फार मोठं नुकसान होणाच्या मार्गावर आहे. 6)ज्याप्रमाणे12 तास विद्युत पुरवठा देण्याच ठरलं असताना देखील 12 तास विद्युत पुरवठा मिळत नाही आणि त्याचा लोड हॉलतेज कमी असल्यामुळे त्यातलं मोटार पम्प देखील जळत असतात आणि म्हणून 12 तास विद्युत पुरवठा विथ हॉलतेज सोबत मिळायला पाहिजे 7)आमचा गडचिरोली जिल्ह्य हा जंगल व्याप्त जिल्हा आहे.जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती वाघ आणि डुक्कर या प्राण्यांच निवास आहे खूप प्रमाणात आहे. त्यामुळे मक्क्या पिकवण्याऱ्या शेतकऱ्यांच पण इथं मोठा नुकसान झालेला आहे. आणि त्या शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळण्यात यावी. आणि याच प्राण्यापासून संरक्षण व्हावं यासाठी आणि गडचिरोली जिल्ह्यात रस्त्याची अवस्था फार बिकट आहे. आणि त्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी.8) महत्वाचा म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे धान्य खरेदी केल्या जाते. टीडीसी आणि फेडरेशन च्या मार्फत पण त्या धानाचे चुकारे वेळेस मिळत नाही आणि शासनाच्या वतीने 25,000 हजार बोनस अस म्हंटल गेलं. ते देखील अजूनपर्यंत मिळालं नाही. आणि कर्ज माफी शेतकऱ्यांना देतो म्हणाले आहेत. ती कर्जमाफी अजूनपर्यंत झाली नाही.9)जे धान्य खरेदी होते आणि रेशन चा काळा बाजार करून धान्य तस्करीचा हजारो कोटींचा घोटाळा झालाय. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार रामदासजी मसराम ह्यांनी अश्या प्रकारचे अतिशय महत्वाचे मुद्दे ठामपणे मांडले आहेत10)शाळा व्यवस्थापणेचा जो हादरून सोडणारा जो निर्णय झाला 15 मार्च 2024 जो निर्णय अत्यन्त चुकीचा आहे तो रद्द करण्यात यावा. 11)आणि शेवटचा मुद्दा असा होता की शिक्षक भरती गडचिरोली जिल्ह्यात करण्यात यावी हा देखील महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला.शेवटचा मुद्दा पण महत्वाचा असताना देखील सरांना बोलू देत जात नव्हता पण त्यानी ते व्यवस्थित रित्या मांडून सर्व प्रकारच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी ठामपणे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मुद्दे मांडले.