चंद्रपुर ते महाबोधी बोद्ध विहार गया तीर्थ दर्शन ट्रेन रवाना

Thu 06-Feb-2025,07:55 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत आज सायंकाळी चंद्रपूर रेल्वे स्थानकाहुन जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पात्र लाभार्थ्यांना घेऊन चंद्रपूर ते महाबोधी बौद्ध विहार गया अशी तीर्थदर्शन ट्रेन ५ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानकावरुन रवाना झाली राज्य शासनाने लोककल्याणकारी धोरण आखुन सर्वसमावेशक घटकांना लाभ देण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वाकांशी योजना सुरू केल्या त्यातील च वुद्धांकरताची मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ ५ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातुन झाला.या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र वुद्ध लाभार्थ्यांना बिहार राज्यातिल गया येथील महाबोधी बौद्ध विहार दर्शनासाठी नेल्या जात आहे.वृद्धापकाळात तिर्थाची ओढ माणसाला स्वस्त बसून देत नाही हे तेवढेच खरे आहे परंतू आपल्या लोककल्याणकारी राज्य सरकारने आता त्या भावनीक ओढीला मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेचा सेतू बांधून वृद्धांना तिर्थाटनाचा मोफत व सुलभ लाभ देण्याचा हा सुत्य कार्यक्रम योजला आहे. या ट्रेन ला राजुरा चे आ. देवराव भोंगाळे यांनी हिरवी झेंडी दाखवून ट्रेन ला रवाना केले. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालिका आशा कवाडे, प्रतिभा भागवतकर, सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, स्मिता बहिरमवार, रेल्वेचे अधिकारी तसेच अनेकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.