अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदारांची आकस्मिक भेट,गैरहजर असलेल्यांवर कारवाईचे दिले निर्देश

प्रतिनिधी : सुनिल हिंगे (अल्लिपुर )
देवळी पुलगाव मतदार संघाचे आमदार राजेश बकाने यांनी शुक्रवारी सायंकाळी अलिपूर् येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मिक भेट देत पाहणी केली. यावेळी केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच झडती घेत क्लास घेतला. तसेच गैरहजर असलेल्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत.
आमदार राजेश बकाने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच केंद्रात एकूण किती कर्मचारी आहेत, याबाबतचा आढावा घेतला. तसेच किती आरोग्य शिबिर घेण्यात आली याची माहिती घेतली. लसीकरण किती झाली याबाबत माहिती घेतली त्यानंतर औषधीचा स्टॉक किती आहे, हे देखील जाणून घेतले. यावेळी केंद्रात उपस्थित कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश आमदारांनी दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून दिले निर्देश
लसीकरणाची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याने आमदार राजेश बकाने यांनी तालुका आरोग्य अधिकारी प्रभाकर नाईक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. पराडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत त्यांना निर्देश दिले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे चार ठिकाणचा भार असल्याने त्या गैरहजर होत्या. परिणामी, त्यांच्यावर कार्यवाहीचे आदेश त्यांनी दिले.
हयगय मुळीच खपवून घेतली जाणार नाहीच...
आमदार बकाने यांनी आरोग्य केंद्राची तपासणी करत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारची हयगय खपवल्या जाणार नाही. सर्वांनी नियमित वेळेवर येत कर्तव्य पार पाडावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी माजी सरपंच नितीन चंदनखेडे, माजी पंचायत सदस्य अशोक सुपारे, माजी जिल्हाध्यक्ष नाना ढगे, अशोक सुपारे, सतीश काळे उपस्थित होते.