उन्हाळी लाठी -काठी मासिक प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन

नदीम शेख ( हिंगनघाट )
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे शिवसेना पक्षातर्फे उन्हाळी लाठी -काठी मासिक प्रशिक्षण शिबिराचे उत्साहापूर्ण वातावरणात उदघाटन पार पडले या कार्यक्रमा चे आयोजक जेष्ठ शिवसैनिक वर्धा जिल्हा संघटक शिवसेना राजूभाऊ हिंगमिरे हे असून उदघाटक म्हणून शिवसेना तालुका प्रमुख अमित गावंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबिरामुळे मुलामुलींना लागलेल्या सुट्यांचा फावला वेळ टिव्ही व मोबाईल मधे घालण्यापासून दुर ठेवता येईल तसेच संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाचे सतिशभाऊ चौधरी,सोनू लांजेवार, प्रविण वैरागडे, विलास हांडे,प्रतिक चापले, कुलभूषण वासनिक, दिनेश काटकर, अमित काळे, संतोष ठाकूर, आतिश सातपुते,आतिश उताणे, विवेक धात्रक, विक्की राऊत,सतिश तांबोळी,संदीप गोतमारे, कैलास सहारे, गोपाल जांभुळे,अखिल देवरे, मुन्ना कोळसे, निखील झोडेइतर समस्त सदस्यगण , पालकवर्ग व प्रशिक्षक राहुलभाऊ तालेवार यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.सरतेशेवटी उपस्थितांचे राहुल टेंभुर्णे यांनी आभार मानले.व कार्यक्रमाची सांगता केली.