विसापूर येथे गोंडवाना विद्यापीठातर्फे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

Fri 21-Feb-2025,06:46 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

केंद्रिय मंत्री रक्षा खडसे यांनी आ. मुनगंटीवार यांच्या विकासकामांना दिली दाद बल्लारपूर:विसापूर, दि.२१- एका दिवसात चंद्रपूरचा विकास बघणे शक्य नाही. यापुढे मी दोन दिवसांकरिता चंद्रपूरच्या दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांच्या व्हीजनमधून झालेली कामे बघणार आहे. त्या कामांचा अभ्यास करणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीने हा परिसर विकसित केला, तसेच काम मला माझ्या मतदारसंघात करायचे आहे. मी हे करू शकले तरच माझ्या पदाला मी न्याय देऊ शकेन, या शब्दांत केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामांना दाद दिली.चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विसापूर येथे गोंडवाना विद्यापीठातर्फे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, भाजप पदाधिकारी काशीनाथ सिंह, डॉ.मंगेश गुलवाडे, प्रज्वलंत कडू, समीर केणे, सविता कांबळे, नम्रता ठेमस्कर यांच्यासह व्यवस्थापन परिषद व सिनेटचे सदस्य, क्रीडा प्रशिक्षक व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, ‘चंद्रपूर जिल्हा मागासलेला आहे. विकासाच्या बाबतीत खूप मागे आहे, असे चित्र रंगवण्यात आले होते. पण इथे आल्यावर कळले की, चंद्रपूर-गडचिरोली जिल्हे विकासाच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी येथे अतिशय उत्तम पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत.’ मी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री म्हणून देशभर फिरते. तेव्हा काही राज्यांतील सुविधा बघून आपल्या राज्यात अश्या सुविधा का नाहीत,याची खंत वाटते. पण चंद्रपूरमध्ये आल्यानंतर ही खंत राहिलेली नाही.आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा शब्द देते, असेही रक्षा खडसे म्हणाल्या.फक्त खेळाचे मैदान नाही, वाघाची भूमी आहे - आ. मुनगंटीवारखेळाच्या मैदानावर उतरल्यावर जिद्दीने आपला खेळ खेळा. फक्त खेळाचे मैदान म्हणून या भूमिकडे बघू नका. तर तुम्ही वाघांच्या भूमित आलेले आहात. त्यामुळे हा महोत्सव तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल अशी कामगिरी करून दाखवा, असे आवाहन राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.‘मिशन ऑलिम्पिक २०३६ ऑलम्पिक २०३६ मध्ये मेडल घेणारा खेळाडू माझ्या जिल्ह्याचा असला पाहिजे, असा माझा प्रयत्न आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसें यांना येथील पायाभूत सुविधांचे कौतुक केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा क्रिडा क्षेत्रात आणखी विकास करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी अधिक चांगल्यात चांगल्या सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न भविष्यात राहतील, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.