वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूर द्वारे शांती कॅन्डल मार्च चे आयोजन

Fri 25-Apr-2025,08:00 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

बल्लारपुर: वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे पहलगाम येथील आतंकवादी हमल्याचा निषेध व भारतीय शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक 25 एप्रिल 2025 ला सायंकाळी बल्लारपूर येथे शांती कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले असून सर्व पदाधिकारी कार्यकर्ता सह समस्त भारतीय नागरिकांनी या शांती कॅन्डल मार्च मध्ये उपस्थित राहावे अशी विनंती रेखा पागडे शहराध्यक्षा वंचित बहुजन महिला आघाडी , बल्लारपूर यांनी केली आहे.हा कॅन्डल मार्च पाली बुद्ध विहार विद्यानगर वार्ड, येथून निघणार असून हा कॅन्डल मार्च बल्लारपूर ते नगरपरिषद परिसर बल्लारपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचणार आहे. तत्पश्चात भारतीय शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती एका पत्रकान्वये करण्यात आली आहे.