आम आदमी पक्षा तर्फे रेल्वे महाप्रबंधकांना विविध मागण्यांबाबत निवेदन

Sun 16-Feb-2025,08:30 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

बल्लारपूर:बल्लारशाह रेल्वे स्टेशन व प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी.बल्लारपूर,शुक्रवार दिनांक:- 14/02/2025 मध्य रेल्वे चे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांचे बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले. महाप्रबंधकांचे रेल्वे स्थानकावर आगमन होणार हि बातमी मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकाचा चेहरामोहराच बदलण्यात आला होता. याबद्दल शहराध्यक्ष पुप्पलवार यांनी धर्मवीर मीना यांना सांगितले कि हा बदल आपल्या आगमनाच्या अनुषंगानेच करण्यात आला आहे. अशीच व्यवस्था नेहमीकरिता असावी व महाप्रबंधकांच्या आगमनानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या खर्चाची माहिती देखील आपतर्फे मागण्यात आली.यासोबतच निवेदनामार्फत पुढील मागण्या करण्यात आल्या.1) बल्लारशा ते मुंबई साठी सेवाग्राम पॅसेंजर थेट सुरू करावी.2) तात्काळ टिकीटासाठी उचित व्यवस्था करण्यात यावी.3) वयोवृद्ध व दिव्यांगांसाठी गाडीची सुविधा देण्यात यावी व जेष्ठ नागरीकांसाठी सवलत सुरू करण्यात यावी.4) रेल्वे स्थानकावर महिलांसाठी प्रसाधनगृह मोफत व पुरुषांना मुत्रालय मोफत उपलब्ध करून द्यावे.5) रेल्वे स्थानकावरून बल्लारशा ते काजीपेट – रामगिरी पॅसेंजर, बल्लारशा ते नामपल्ली – भाग्यनगर एक्स्प्रेस व बल्लारपूर ते नागपूर लोकल सुरू करण्यात यावे.6) काजीपेट - पुणे ट्रेन आठवड्यातून तीन दिवसांसाठी सुरू करण्यात यावे.7) बल्लारशा - गडचांदुर - आदिलाबाद साठी नविन रेल्वे लाइन सुरू करण्यात यावे.8) वस्ती विभागाकडून प्रवाशांसाठी गेट ओपन करून देण्यात यावे.9) बल्लारपूर रेल्वेच्या जागेवर वस्ती विभागालगत असलेले ड्रेनेज व नाल्यांचे दुरुस्तीकरण करावे.10) पार्किंग सुविधा शुल्क मिनिमम करण्यात यावे.11) चोरीचे प्रकरण थांबविण्यासाठी सर्व पॉईंट वर CCTV कॅमेरे लावण्यात यावे.12) बल्लारपूर GRPF ठाण्यात आवश्यकतेनुसार स्थाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात यावे.13) आयरन–ओर साइड नी होणाऱ्या प्रदूषण प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजना त्वरित आखण्यात यावी.वरील मागण्यांबाबत त्वरित विचार करून सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. असे आप शिष्टमंडळाने निवेदनामार्फत मागणी केली.यावेळेस शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार,शहर उपाध्यक्ष अफजल अली,कोषाध्यक्ष प्रा.प्रवीण सातपुते,सह संघटक सलमा सिद्दीकी,महिला अध्यक्षा किरण खन्ना, उपाध्यक्षा मनिषा अकोले,सर्मन बन्सेल,शेखर तेलरांधे,रमेश लालवाणी, सम्यक गायकवाड,रेखा भोगे,रेणुका गायकवाड व इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.