गरीब कुटुंबातील युवती निक्कू हीने एमपीएससी परीक्षा केली उत्तीर्ण

Sat 15-Feb-2025,04:20 AM IST -07:00
Beach Activities

सुनिल हिंगे (अल्लिपुर् )

घरची परिस्थिती हालाखीची असतानाही परिस्थितीला न डगमगता कठीण परिश्रम करून शिरसगाव येथील अनंता तोडासे यांची मुलगी नीक्कु हीने अहोरात्र मेहनत करून आपल्या आई वडिलांची मान उंचावली असून शिरसगावगावतील आजपावेतो एकही विदयार्थी व विद्यार्थिनींनी एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली नसून ही गावकऱ्यांसाठी गौरवाची बाब आहे.

नीक्कू अनंता तोडासे शिरसगाव असे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलीचे नाव आहे. आई वडील दोघेही रोजमुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. याही परिस्थितीत निक्कुने अभ्यासातील सातत्य कायम ठेवले त्याच परिस्थितीवर अवलंबून न राहता ति परिस्थिती बदलविण्याकरीता तिने कठोर परिश्रम करून आपले कर्तव्य पार केले. यातूनच तिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली यामुळे सामजिक कार्यकर्ता रणधिर येसंबरे व त्यांच्या पत्नी सविता येसंबरे यांनी तिचे घरी जाऊन मुलीचे व आई वडिलांचे अभिनंदन करून आभार मानले.

यावेळी गावातली नागरिक मोठया संख्येने उपस्थिती होते.