सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा परिषद गोंदिया चे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या अध्यक्षतेखाली तथा पक्षाचे ओ.बी.सि. सेल राज्य सरचिटणीस प्रभाकर दोनोडे, तालुकाध्यक्ष डॉ.अजयजी उमाटे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. सदर बैठकीत येत्या दिनांक ९ फेब्रुवारी ला गोंदिया येथे आयोजित स्वनामधन्य व्यक्तिमत्व स्व.मनोहर पटेल यांच्या जयंती निमित्त नियोजन तसेच सालेकसा तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मजबूत संघटन बांधणीसाठी चर्चा आयोजित करण्यात आली.तसेच नवनियुक्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांचे सत्कार करण्यात आले.याप्रसंगी माजी जि.प.सदस्य बिसराम चर्जे, जियालालजी पंधरे, लक्ष्मण नागपुरे,ब्रजभूषण बैस शहर अध्यक्ष,गीता चौधरी,चुन्नीलाल सहारे,राजु डोंगरे,सुनीता ताई थेर,अशोक गिरी,संतोष नागपुरे,दौलत अग्रवाल,रघुदास नागपुरे,संदिप मिश्रा, गगन छाबडा, बबलू बिसेन,महेंद्र कटरे,विजय भांडारकर,ओमप्रकाश पारधी,कमलेश लिल्हारे,अंकित मिश्रा,सीता अवस्थी, संतोषी चुटे,उषा वऱ्हाडे, सीमा बैस,जितेंद्र बडोले,महेश कुमार मच्छिरके आणि समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.