ऑपरेशन मुस्कान मुळे मिळाले पालकांचे ओठावर हसू

Sat 21-Dec-2024,08:36 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर :ऑपरेशन मुस्कान मुळे पालकांचे ओठावर हसू आले . असुन जिल्ह्यात २१० लोकांना पोलिसांनी शोध मोहीम राबवत परिवाराला स्वाधीन केले . १ डिसेंबर २०२४ ते २० डिसेंबर २०२४ दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशन अंतर्गत बेपत्ता व पळविलेली मुले,मुली तसेच बेपत्ता महिला व पुरुषांच्या शोधासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस दलात ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात आली.ऑपरेशन मुस्कान या विशेष मोहीम करीता चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलिस ठाण्यामध्ये विशेष पथक नेमण्यात आले.ऑपरेशन मुस्कान या विशेष मोहिमे दरम्यान जिल्हयातील पळविलेल्या मुले, मुली पैकी १ मुलगा आणि ५ मुलीचा शोध घेवुन त्यांच्या आई-वडील, कायदेशीर पालकांचे स्वाधिन करण्यात आले आहे.तसेच बेपत्ता झालेल्या महिला व पुरुष पैकी १३३ महिला आणि ७१ पुरुष असे १ डिसेंबर २०२४ ते २० डिसेंबर २०२४ पावेतो जिल्हयात एकुण २१० मुले, मुली आणि महिला व पुरुषांचा शोध घेण्यास चंद्रपूर जिल्हा पोलीस दलास यश आले आहे. विशेषतः या विशेष मोहिम दरम्यान सन २०१६ व २०१७ मधील हरविलेले दोन तरुणींचा शोध घेण्यास यश आले आहे.सदरची मोहिम अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी समवेत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व त्यांचे अधिनस्त विशेष पथक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.