आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या जी बी एम एम विद्यालय हिंगणघाट च्या सानवी चा मातृवृक्ष कडून सत्कार
प्रतिनिधि :नदीम शेख
हिंगणघाट : येथील जी बी एम एम विद्यालयाची कु सानवी अजय झलके हिने राष्ट्रीयता यक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. या बद्दल मातृवृक्ष शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था वर्धा च्या वतीने गुलाब रोप व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यवतमाळ येथे १३ ते १५ डिसेंबरदरम्यान राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या क्रीडा महोत्सवामध्ये विविध खेळांचा समावेश होता. त्यामधील तायक्वांदो या खेळामध्ये स्नेहदीप मार्शल आर्ट क्लबची व जी बी एम एम विद्यालयाची इयत्ता सातवीची विद्यार्थीनी सानवी विजय झलके हीने 35 किलो वरील वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे तीची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या यशाबद्दल मातृवृक्ष संस्थेचे अध्यक्ष तिरभाने सर, उपाध्यक्ष डॉ अनिस बेग, सचिव श्री किशोर उकेकर, त्रिरत्न नागदेवे, प्रदीप मोकदम, अरविंद दहापुते, अजय खंडाईत, व शाळेचे मुख्याध्यापक,सुनील फुटाणे, पर्यवेक्षक संजय तराळे शिक्षक आनंद साखरे,कापकर, वरकडे, खंदारे, वैद्य,उईके, उताणे, आष्टनकार, वर्ग शिक्षिका नियाजी, कुंभलकर,बिडकर, नदनवार, साळवीकर व माध्यमिक शिक्षक काटेखाये पवार, कन्नाके, काटकर,चाफलेकर, माध्यमिक शिक्षिका दांडेकर, वाघ, म्हैसगवळी सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे. समाजातील सर्व स्तरावरून सानवी वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.