भारतरत्न अटल बिहारीं वाजपेयी यांची जयंती साजरी
अरबाज पठाण ( वर्धा )
वर्धा शहर भारतीय जनता पार्टी तर्फे दि 25 रोजी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस "सुशासन दिन" म्हणून साजरा करण्यात आला. स्थानिक शासकीय विश्रामगृह च्या समोर मा. अटलजीचे अतिशय आकर्षक असे स्मारक आमदार पंकजजी भोयर यांच्या संकल्पनेतून साकरण्यात आले, त्याच ठिकाणी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन भारत मातेच्या या थोर सुपुत्रास अभिवादन केले. अटलजीनी त्यांच्या शैलीत सादर केलेल्या कविता पासून प्रेरणा घ्यावी व राष्ट्रकार्यास समर्पित व्हावे म्हणून अटलजीच्या कविताची ध्वनीफीत यावेळी लावण्यात आली होती.
माजी खासदार रामदासजी तडस, ज़िल्हाध्यक्ष सुनिलजी गफाट, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल तराळे, भाजपा शहर अध्यक्ष निलेशजी पोहेकर, विधानसभा निवडणूक प्रमुख प्रशांतजी बुर्ले, विधानसभा प्रमुख निलेशजी किटे, भाजपा ज़िल्हा मुख्यालय प्रभारी श्रीधरजी देशमुख,प्रदीप सिंग ठाकुर जगदीशजी टावरी, विलास आगे, मारुती राऊत, प्रणव जोशी, श्रेयाताई देशमुख, निताताई सूर्यवंशी, दिलीपभाऊ पाचखेडे, आणि मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.