चोरी करणारा चोर गजाआड गुन्हे शोध पथकाची कार्यवाही
अरबाज पठाण ( वर्धा )
पो.स्टे. वर्धा शहर येथे फिर्यादी महेंद्र राम बमनोटे वय 54 वर्षे रा. स्नेहल नगर वर्धा यांनी दि. दिनांक 08/12/24 रोजी तकार दिली की, दिनांक 07/12/24 रोजी रात्री 11/00 वा. दरम्यान यातील फिर्यादी नेहमी प्रमाणे मंदिराचे व पुढचे मुख्य दाराला कुलुप लावुन मंदिर बंद केले, मंदिराचे पुजारी हे नेहमी प्रमाणे सकाळी 05/00 वा. दरम्यान मंदिरात पुजाअर्चा करण्यास आले असता त्यांना मंदिराचे मागील दाराचे कुलुप तुटुन असल्याचे दिसले, तसेच मंदिराचे गाभाऱ्यातील दानपेटी फुटुन असुन तिथेच मंदिराचे पुजारी यांना लोखंडी सब्बल पडुन दिसले मंदिराचे पुजारी यांनी फियादी यांना चोरी बाबत सांगीतल्या नंतर फिर्यादी मंदिरात जावुन पाहनी केली असता कोणीतरी अज्ञात ईसमाने मंदिराचे मागील बाजुने वरुन मंदिरात प्रवेश करुन दाराचे कुलूप तोडुन मंदिरातील दानपेटी फोडुन अंदाजे 20,000/ रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे अशा फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. ला अप. क. 2046/2024 कलम 305 (अ) 331 (4) बि.एन. एस. चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्याण गुप्तबातमी दाराकडुन मिळालेल्या खबरे वरून यातील आरोपी नागेश तुळशीराम मसराम वय 32 वर्ष रा. शिवनफळ ता. समुद्रपुर जी. वर्धा यास दिनांक 16/12/2024 चे 07/20 वा. ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने हनुमान मंदिर स्नेहल नगर वर्धा येथे चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे पासुन चोरी गेलेली किंमत 20,000/ रू. मधुन 5500 / रुपये जप्त करण्यात आले आहे, व त्याचे अंगझडती मध्ये एक निळ्या रंगाचा अॅन्ड्राईड मोबाईल किंमत 7000/रु. असा जु.कि. 12,500/रू चा माल जप्त करण्यात आला. तपासा दरम्यान त्यास अधिक विचारपुस केली असता पो.स्टे वर्धा शहर येथील अप कमांक 1998/24 कलम 305 (अ) 331 (4) बि.एन.एस. मधील चोरी केलेले 47 चप्पल जोड प्रती जोड 100/रु. प्रमाणे 4700/रु. अप कमांक 2115/24 कलम 305 (अ) 331(4) बि.एन.एस.मधील पानटपरी मध्ये चोरी केलेले पानटपरी मधील सामान किंमत 8910/रु. व चोरी करते वेळी त्याचे ताब्यातील एक स्टिलची टॉमी किंमत 200/रु. असा
एकुन किंमत 9110/रुपये असा एकुन मंदिर चोरी व पानटपरी मध्ये चोरी केलेली एकुन रिकव्हरी 26,310/ रुपये यातील आरोपी याने तपास दरम्यान दिली आहे, तसेच पो.स्टे. रामनगर हददीतील मंदिर मध्ये चारी व पो.स्टे. सेवाग्राम हददीतील 02 पानटपरी व 01 मोबाईल दुकान चोरी केल्या बाबत तपासात कबुली दिली आहे,
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे व उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो.नी. पराग पोटे पो.स्टे. वर्धा शहर, यांचे निर्देर्शाप्रमाणे, गुन्हे शोध पथक प्रमुख स.पो.नी. विकास गायकवाड पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पोहवा शैलेष चाफलेकर, पोहवा किशोर पाटील, सहकारी पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पवण लव्हाळे, पोलीस शिपाई श्रावण पवार, वैभव जाधव, योगेश ब्राम्हण, नंदकिशोर धुर्वे शिवा डोईफोडे मयुर वाडेकर, मपोशी गौरी भुसारी पो.स्टे. वर्धा शहर यांनी केली.