दोन राज्यांतील सराईत गुन्हेगार वर्धा पोलीसांनी घेतले ताब्यात,अट्टल चोरट्यांकडून जुने चोरीचे गुन्हे उघडकीस..
अरबाज पठाण ( वर्धा )
सदर हकिकत याप्रमाणे आहे की दिनांक २६ ऑगस्ट २०१९ रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे फिर्यादी नामे रवींद्र हरीहर राव आशिषगडे वय ६३ वर्षे राहणार सिव्हिल लाईन वर्धा येथे राहत असून यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे येऊन रिपोर्ट तयार करून दिली की माझ्या घरी चोरी झाली आहे यावरून पोलिस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक १४४४/२०१९ कलम ४५७ ३८० भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्धा पोलीसांनी जुने गुन्हयाचे अनुषंगाने तपास यंत्रणा चालवून आरोपी नामे शेख मोबीन शेख इस्त्राईल वय २६ वर्षे राहणार बेंडकिपुरा चमेडीया नगर जिल्ह्य यवतमाळ हल्ली मुक्काम शाहीन नगर पिरकी मंडी हैदराबाद ( तेलंगणा ) यास वर्धा पोलीसांनी पकडून त्याचा कडून गुन्ह्यांतील वापरलेले मोटारसायकल क्रमांक एम एच ३२ ए सी ५०६० किंमत २५,०००/- रुपये जप्त करून आरोपीला न्यायालयात न्यायदंडाधिकारी वर्धा यांच्या कडून पोलिस कस्टडी प्राप्त करून सदर आरोपीला पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे अभिलेखावर असलेल्या इतर गुन्हाबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्य केल्याचीही कबुली दिली तो सोन्याचा चोरी केल्याचा मुद्देमाल हैदराबाद येथे घरी लपवून ठेवल्याचे सांगितले वरुन पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील डिबी पथकाचे पोलिस हवालदार शैलेश चाफलेकर व त्यांचे सहकारी असलेले पथक त्यांच्या पथकाने पोलिस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी सह हैदराबाद येथे जाऊन त्यांच्या कडून पोलिस स्टेशन वर्धा येथे दाखल असलेले जुने गुन्हयाचे अपराध क्रमांक १४००/२०१९ कलम ४५७ ३८० भादवी मधील फिर्यादी नामे अजमल रफिक शेख राहणार पावडे नर्सिंग होम मागे वर्धा यांच्या घरुन चोरी केल्याची एक सोन्याची ५ ग्रॅमची अंगठी किंमत ३५,०००/- रुपये दुसऱ्या गुन्हा अपराध क्रमांक १४००/२०१९ कलम ५४७, ३८०, ५११ भादवी मधील फिर्यादी नामे हुसेन शेख राहणार महादेवपुरा वर्धा यांच्या घरुन चोरी केलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत १,४०,०००/- रुपये आणि १५ ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन किंमत ९५,०००/- रुपये आणि सन २०२० मधील अपराध क्रमांक १५४१/२०२० कलम ४५४, ३८० भादवी मधील फिर्यादी नामे दिलीप पारधी राहणार बोरगाव मेघे वर्धा यांच्या घरुन चोरी केलेले एक १० ग्रॅम सोन्याची चैन किंमत ७०,०००/- रुपये असा एकूण किंमत ३,४०,०००/- रुपयांचा सोन्याचा किंमती मुद्देमाल आरोपी कडून हस्तगत करुन हैदराबाद येथुन आरोपीस घेऊन वर्धा येथे येऊन पोलिस स्टेशन वर्धा येथील अभिलेखावरील जुने ३ गुन्हे शिताफीने उघडकीस आणले सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद महेश्वर पोलिस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड डिबी पथकाचे पोलिस हवालदार शैलेश चाफलेकर, किशोर पाटील, पंकज भरणे, पवन लव्हाळे पोलिस शिपाई नंदकिशोर धूर्वे शिवा डोईफोडे यांनी केलेली आहे.