नवरा बायको च्या झटापटीत साल्याचा पोटाला लागले चाकु:गडचांदुर येथील घटना

Thu 26-Dec-2024,10:24 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर     

चंद्रपूर: पत्नीला घेण्यासाठी सासऱ्याच्या घरी आलेल्या भाऊजी ने भांडणात चाकूचा वार केल्याने साला जखमी झाला.सदर घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता गडचांदूर पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या रामनगर कॉलनी नांदा येथे घडली.रहीम जमील शेख (२६), रा.नांदा यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची बहीण सायरा शेख हिचा विवाह कोरपना तालुक्यातील बाखर्डी गावातील चांद शेख (३७) याच्याशी ७ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र चांद शेखला दारूचे व्यसन असल्याने तो अनेकदा सायरा शेखला मारहाण करत असे.त्यामुळे सायरा गेल्या तीन महिन्यांपासून नांदा येथील आपल्या माहेरी आहे. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी चांद शेख हा पत्नीला घेण्यासाठी आला होता.पण त्याच्या व्यसनामुळे सायरा जायला तयार नव्हती.याचा राग आल्याने चांद शेख याने तिला मारण्याचा प्रयत्न केला असता तिने जोरात आरडाओरडा केला. बहिणीचा आवाज ऐकून रहीम बाहेर आला तेव्हा त्याला त्याच्या भाऊजीच्या हातात एक चमकणारा स्टील चाकू दिसला.आपल्या भाऊजीला बजावत असताना रहिमने चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला.या झटापटीत रहिमच्या पोटाला चाकू लागला.यामुळे तो जखमी झाला.जखमी रहीम शेख यांच्या तक्रारवरून गडचांदूर पोलिसांनी चांद शेख याच्याविरुद्ध कलम ११८ (१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.