अमित शहा यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढणार
अथर शेख ( वर्धा )
भारताचे संसद भवन मध्ये देशाचे गृह मंत्री अमित शहा यांच्या कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले गेले,या वक्तव्यामुळे समस्थ भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या.समुच्या भारतात जनता रस्त्यावर उतरून या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आहे.
याच अनुषंगाने ए.आय.एम.आय.एम पक्षाचे आसिफ खान यांनी सत्तेची मग्रुरी चढलेल्या अमित शहा यांची दिनांक 27 डिसेंबर रोजी जमनालाल बजाज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचा निषेध करणार असल्याचे जाहीर केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान विरोधी असणारे भारतीय जनता पार्टी चे केंद्र सरकार आणि त्यांच्या नेत्यांना या प्रतिकात्मक प्रेत यात्रे द्वारा हे लक्षात आणुन द्यायचे आहे की अश्या प्रकारे होत असलेल्या भाष्यावर वेळीच आवर घालावा अण्यथा ए.आय.एम.आय.एम अजुन तीव्र आंदोलन करेल.
अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह विधान बद्दल भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी आसिफ खान यांनी केली.l