रस्त्यावरील खड्ड्याची डागडूजी करून केली जनजागृती आरमोरी बचाओ समिती चा स्तुत्य उपक्रम

Sun 22-Dec-2024,11:03 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी :- गडचिरोली- नागपूर व साकोली -गडचिरोली हे दोन्हीही राष्ट्रीय महामार्ग आरमोरी शहरातील टी पॉइंट येथे येऊन मिळतात शहरातील या टी पॉइंट च्या वळणावर बऱ्याच महिन्यांपासून खडा पडलेला होता या खड्ड्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता कायम होती ही गंभीर बाब लक्षात घेऊन आरमोरी बचाओ समिती तर्फे खड्ड्याची डागडूजी दिनांक. २२/१२/२०२४ रविवार ला दुपारी २:०० वाजता करण्यात आली व हेल्मेट वापरा सुरक्षित रहा,वाहतुकीचे नियम पाळा,मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक,या प्रकारचे घोषवाक्य बोलून वाहतूक संबंधित जनजागृती करण्यात आली याप्रसंगी आरमोरी वाहतुक पोलिस अधिकारी पठाण सर,होमगार्ड प्रमोद गोंदोळे,आरमोरी बचाओ समितीचे पदाधिकारी राकेश सोनकुसरे ,राहुल जुआरे,पंकज इंदुरकर लीलाधर मेश्राम ,सारंग जांभूळे,मनोज गेडाम, रोहीत बावनकर,गौरव करंबे,प्रवीण अंबादे,शुभांगी गराडे व शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.