युवकाची चाकूने वार करीत निर्घृण हत्या
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : मुल किरकोळ वादातून जिल्ह्यातील मुल येथे युवकाची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केली. मुल शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून यामागे अवैध धंदे असल्याचे बोलले जात आहे.काल रात्री १०.३० च्या सुमारास ऋतिक शेंडे वय २४ वर्ष याची चाकूने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आले होते. ऋतिक शेंडे मुल येथील विहीरगाव परिसरात राहत असून पंचायत समिती समोरील महामार्गावर काही युवकांनी त्याच्यावर चाकूने वार केले.पोलीस स्टेशन मुल गु.र.नं - ५१२/२०२४ कलम १०३ (१), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दाखल खुनाचे गुन्हयातील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे विविध पथके तयार करून दि.२७/१२/२०२४ रोजी गुन्हा घडलेपासुन अथक प्रयत्नाने सातत्याने आरोपीताचा शोध चंद्रपूर व लगतच्या जिल्हयात घेत असतांना नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे राहुल सत्तन पासवान, वय २० वर्षे,शिक्षण १२ वी, रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५, मुल, ता.मुल.जि. चंद्रपूर, त्याचा साथीदार आरोपी अजय दिलीप गोटेफोडे, वय २२ वर्षे, रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५, मुल, ता.मुल.जि. चंद्रपूर व विधीसंघर्षित बालक यास दि.२८/१२/२०२४ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतुन ताब्यात घेण्यात आले.सदरची कारवाई सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर,रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.असुन पुढील तपास दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी,मुल विभाग यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मुल करीत आहेत.