दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघातात,दोघे जन गंभीर जखमी

Mon 30-Dec-2024,04:18 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावर एसएनडीटी निर्माणाधीन विद्यापीठाजवळ दुचाकी क्रं.एमएच३४ एई ७५८४ ने अपघात घडल्याची घटना २९ डिसेंबर रविवारला घडली.यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून एक अती गंभीर असल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले.अपघातात गंभीर जखमी झालेले युवकाचे नाव मिलिंद प्रकाश गाडगे (४२) बंडू डांगे (४६) रा. अशोक नगर वार्ड क्रमांक ३ विसापूर आहेत.

दुचाकीस्वार मिलिंद गाडगे व मागे बसलेला बंडू डांगे हे बल्लारपूर वरून आपले काम आटपून विसापूरला येत असताना निर्मनाधीन एसएनडीटी विद्यापीठा जवळील बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावरील वळण रस्त्यावर त्यांची दुचाकी अनियंत्रित झाल्याने डिव्हायडरला आदळली यामध्ये दुचाकीस्वार मिलिंद गाडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याचा सहकारी बंडू डांगे हा सुद्धा गंभीर जखमी झाले.त्यांना ऑम्बुलन्स ने चंद्रपूर शासकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. त्यापैकी मिलिंदची प्रकूती गंभीर असल्याने त्याला नागपुरमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.