शालेय शिक्षणासोबत खेळही महत्त्वाचे : सुधीर दिवे आंतरशालेय राज्य, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न

Mon 06-Jan-2025,06:19 AM IST -07:00
Beach Activities

 

 

     आजच्या युगात सर्वत्र पालक वर्ग आपल्या पाल्यांना शालेय शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यासाठी प्रोत्साहित करतात. परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणासोबतच खेळहि महत्त्वाचे आहे. त्यातच कराटे हा खेळ अंगीकृत केल्यास बोर्डाच्या परीक्षेत वाढीव गुण व शासकीय भरतीत पाच टक्के आरक्षणासह स्वसंरक्षणाचा ही फायदा होईल. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारचे सल्लागार सुधीर दिवे यांनी व्यक्त केले. 

       ते दिनांक 5 जानेवारी 2025 ला दुपारी 1 वाजता प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, धुनीवाले चौक वर्धा. येथे स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित वर्धा जिल्ह्यातील आंतरशालेय राज्य, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. 

     याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक मोहनबाबू अग्रवाल, प्रमुख उपस्थितीत माजी विधान परिषद सदस्य रामदासजी आंबटकर, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका माधुरी दीदी, विशेष अतिथीत महात्मा फुले प्रतिष्ठान वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष पवनभाऊ तिजारे, वर्धा नगरपरिषदेच्या माजी शिक्षण सभापती श्रेयाताई देशमुख, स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही, अध्यक्ष सतीश ईखार, आयोजक स्पोर्ट शोतोकान कराटे - डो इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे सचिव शिहान मंगेश भोंगाडे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

       मागील अनेक वर्षापासूनचा इतिहास मोडून काढत यावर्षी वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक तब्बल 13 खेळाडू महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धेकरिता पात्र झाले. त्यातीलही 4 खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेकरिता पात्र झाले. व राष्ट्रीय स्पर्धेतही एका खेळाडूने मागील दहा वर्षानंतर वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय पदक प्राप्त केले. या ऐतिहासिक व घवघवीत विजया करिता, खेळाडूच्या सन्मानार्थ वर्धा जिल्ह्यातील आंतरशालेय राज्य, राष्ट्रीय खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनबाबू अग्रवाल म्हणाले की, कोणत्याही क्रीडा प्रकारात खेळाडूंनी प्रामाणिकपणे, एकनिष्ठ, शिस्तबद्ध आपल्या खेळाचा सराव सातत्याने केल्यास अपयशावर मात करीत यश मिळतेच. तसेच राष्ट्रीय पदक विजेते पियुष हावलदार याला आंतरराष्ट्रीय मानक ची आरावाझा कंपनीची संपूर्ण कराटे किट भेट देत भावी आयुष्याकरिता शुभेच्छा व आशीर्वाद दिला.

    यावेळी वर्धा जिल्ह्यातील कराटे प्रशिक्षक शिहान उल्हास वाघ, दत्तू कुरेशी, महेश गावंडे, कृष्णा ढोबळे, काशिनाथ रघाटाटे, पराग पाटील, माजी खेळाडू इलाही खान, चेतन जाधव, दिलीप कठाने, ऋषभ सावसाकडे, साहिल वाघ, बोला गजभिये, शंकर मुन व इत्यादी कराटे प्रशिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते.

      कार्यक्रमाची प्रस्तावना संस्था संचालक सभासद प्रकाश खंडार, संचालन संस्था उपाध्यक्ष मोहन मोहिते तर आभार रामनगर शाखाप्रमुख पूजा गोसटकर यांनी मानले.

      कार्यक्रमाला स्पोर्ट कराटे असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष सेलूकर, कोषाध्यक्ष विजय सत्याम, सभासद प्रवीण पेठे, निखिल सातपुते, संचालक मंडळातील सभासद शाम पठवा, मार्गदर्शक यशोधन देशपांडे, पालक प्रतिनिधी डॉक्टर जितेंद्र खेवले, सुजित हावलादार व इत्यादींची उपस्थिती होती. 

    मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती राष्ट्रीय पदक प्राप्त पियुष हावलदार, स्टेट गोल्ड मेडल आयुशी कुरटकर, मोहिनी चूटे, गौरव आशानी, स्टेट सिल्वर मेडल अर्णव लोखंडे, रीधा पठाण, अर्जुन साऊद, स्टेट ब्रांन मेडल भार्गव खेवले, अभिनव गाडवे, पुनम नवघरे, स्टेट स्पर्धेत सहभागी आनंदी कातरकर, चाहत पेटकर, आयान शेख यांना सन्मानचिन्ह, शाल व वृक्ष देऊन सन्मान सत्कार करण्यात आला