युवकांचा महोत्सव, वर्धा युथ फेस्ट २०२५ ला आज पासून सुरुवात

Wed 08-Jan-2025,03:26 AM IST -07:00
Beach Activities

राज्य मंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उत्सवाचा शुभारंभ

 केंद्रीय मंत्री नीती गडकरी यांच्या वर्धेतील युवकांना पत्राद्वारे शुभेच्छा

 

अरबाज पठाण (वर्धा )

संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या हक्काचा मंच मिळवून देणारा बहुचर्चीय उत्सव म्हणजे वर्धा युथ फेस्ट चरखा गृह येथे सुरू होत आहे.

वर्धा जिल्ह्यातील युवकांकरिता विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या युवा संस्थांच्या एकत्री करणातून वर्धा युथ फेस्टिवल कमिटीच्या वतीने वर्धा युथ फेस्ट २०२५ चे आयोजन वर्धेतील चरखा गृह येथे करण्यात येत आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्ह्यातील युवकांना नव्या जगाची ओळख करून देण्यासाठी तसेच नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देण्यासाठी विविध पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करीत आहे. 

या तीन दिवसीय कार्यक्रमा मध्ये युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवशी सकाळी उद्घाटन समारोह नंतर लगेचच डी.आर.डी.ओ. च्या नामवंत वैज्ञानिकांचे मार्गदर्शन वर्धेकरांना ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर याच दिवशी सायंकाळी, वर्धेतील युवकांचे युथ पार्लमेंट चे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये वर्धेतील युवकांमधील राजकारणी प्रतिभा समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराष्ट्रातील उद्योजक व उद्योग सल्लागार यांचे मार्गदर्शन व नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी युवकांना शिकविल्या जाणार आहेत. याच दिवशी सायंकाळी वर्धेतील नाविन्यपूर्ण कला संगम कार्यक्रम “वर्धाज गॉट टॅलेंट” चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये वर्धेतील संपूर्ण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद युथ फेस्टिवल ला मिळाला असल्याचे समिती चे अध्यक्ष सारंग रघाटाटे यांनी सांगितले.

याचबरोबर तिसऱ्या दिवशी भारतीय सैन्य दलाचे महाराष्ट्राचे निवड अधिकारी यांचे भारतीय सैन्यांमध्ये निवड प्रक्रिया कशाप्रकारे पार करायची, या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण वर्धेतील युवकांचा आवडीचा उत्सव उत्सवाचा कार्यक्रम म्हणजे साऊंड फेस्ट युवकांकरिता आयोजीत करण्यात येत आहे वर्धेतील युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्याबरोबरच त्यांना कारकिर्दीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे याकरिता वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण युवकांनी तसेच नागरिकांनी युवकांच्या या विशेष कार्यक्रमाचे कौतुक करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन संपूर्ण वर्धा युथ फेस्टिवल कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.