महात्मा ज्योतिबा फुले ठोक सब्जी भाजी विक्रेता मंडळ बल्लारपूर तर्फे धरणे आंदोलन व मोर्चा
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर :ठोक भाजीपाला विक्रेता व आठवडी बाजारातील दुकानदारांचा विविध मागण्या घेऊन २० जानेवारीला सोमवारला नगर परिषद कार्यालयावर भारत थुलकर माजी नगराध्यक्ष यांचा नेतृत्वात प्रचंड मोर्चा चे आयोजन करण्याता आले आहे.तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ धरने आंदोलन केले जाणार आहेत.बल्लारपुर शहरातील आठवडी बाजारातील अनेक शहरातुन व तेलंगाणा राज्यातुन व्यापार करण्यास दुकानदार येतात.आठवडी बाजारातील दुकानदारांकडून नगर परिषद बल्लारपूर ला ४० वर्षात करोडो रुपयाचा महसूल प्राप्त झाला आहे.परंतु अजुनपर्यंत नगरपरिषद बल्लारपूर तर्फे भाजीपाला ठोक विक्रेते,फळ विक्रेते यांना सुविधाजनक गाळे बांधुन दिले नाही.आठवडी बाजारातील दुकानदारांना बसण्याकरिता ओठे व उन्ह पावसापासुन सरंक्षण करण्या करिता शेड बांधून दिले नाही. आठवडी बाजाराचे राखीव जागेवर विवीध व्यापार संकुल, मटन मार्केट, फीश मार्केट व नगरपरिषद कार्यालयाचे बांधकाम चालू असल्यामुळे आठवडी बाजारातील दुकानदारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून तर आंबेडकर भवन पर्यंत रहदारीचे रस्त्यावर जिव जोखमीमेत टाकुन व्यवसाय करावा लागतो. मार्केट मध्ये येणारे नागरीक, कास्तकारांचे वाहन व भाजीपाला विक्रेते तसेच फळ विक्रेत्यांचे वाहन पार्किंगची व्यवस्था नगरपरिषद तर्फे करण्यात आली नाही. त्यामुळे भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व आठवडी बाजारातील दुकानदारांना व्यवसाय करने कठीन झाले आहे. ठोक भाजीपाला विक्रेता संघटनेने तर्फे दहा वर्षापांसुन नगरपरिषदेला निवेदन सादर करून समस्या सोडविण्याची विनंती करून सुद्धा नगर परिषद बल्हारपुर मागण्याबाबत दुर्लक्ष करित आहे.त्यामुळे या अन्यायाचे विरूद्ध प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता जनहीता करिता सदैव संघर्ष करणारे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत थुलकर यांचे दमदार व कुशल नेतृत्वात महात्मा ज्योतिबा फुले ठोक सब्जी भाजी विक्रेता मंडळ बल्हारपुर तर्फे २० जानेवारी रोज सोमवारला सकाळी १० वाजेपासून २ वाजे पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या जवळ धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे. तसेच २ वाजता नतंर धरणे मंडपापासुन चंद्रपूर आलापल्ली मार्गाने जुना बसस्टेंड मार्गे नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल. तिथे भारत थुलकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात येणार आहे.त्यात ठोक भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व आठवडी बाजारातील दुकानदारांना ५ एकर जागा मंजुर करून एकाच ठीकाणी गाळे बांधून देण्यात यावे. भाजीपाला विक्रेता, फळ विक्रेता व इतर दुकानदार गाळे धारकाकडून आकारण्यात येणारा किराया कमी करून जी. एस.टी. कर रद्द करण्यात यावा. आठवडी बाजारातील दुकानदारांना ओटे व शेड बांधून देण्यात यावे. बाजार चिट्ठी ठेकेदाराने वसुल केलेल्या बाजारचिट्टीची पावती देण्यात यावी असे विविध मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे. आज रविवार आठवडी बाजारात महात्मा ज्योतिबा फुले ठोक भाजी विक्रेता मंडळ कडून अध्यक्ष नासीर बक्ष उर्फ भुरू भाई यांचा नेतृत्वात जनजागरण करून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी सचिव दिपक भगत, उपाध्यक्ष निशांत वनकर, कोषाध्यक्ष प्रवीण ढोढरे, कुलदीप गोरघाटे सह ठोक विक्रेते व हमाल उपस्थित होते