मायवाडी येथील सुरज पांडुरंग नेहारे हा व्यक्ती 15 दिवसा पासून मायवाडी येथून लापता

Sat 18-Jan-2025,07:06 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मंगेश बावणे मोर्शी

पोलिस प्रशासनाला सूरज पांडूरंग नेहारे याला शोधण्यात अपयश

धानोरा ग्रामपंचायत मायवाडी येथील नाव सुरज पांडुरंग नेहारे वय वर्ष 29 हा व्यक्ती सुमारे 15 दिवसापासून लापता असून त्याच्या घरच्यांनी व मित्रांनी पोलीस तक्रार मोर्शी पोलीस स्टेशन येथे केली असून पोलीस स्टेशनचे बीट जमादार निलेश देशमुख सर आहे आणि तपास करत आहे देशमुख सर याना लापता व्यक्तीचे आई-वडील भेटले व त्यांना सूरज पांडुरंग नेहारे लापता असल्याचे सांगितले आणि सविस्तरपणे माहिती दिली पोलीस अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की आम्ही आमची कारवाई चांगल्या प्रकारे करत आहे आणि लवकरात लवकर या व्यक्तीचा शोध घेतल्या जाईल.