महिला व मुलींना स्वत:चा आत्मविश्वास वाढविणाची गरज :- मोहन अग्रवाल वर्धा
अरबाज पठाण ( वर्धा )
समाजात स्त्रियांना अजूनही एक कमजोर घटक समजून त्यांच्यावर नेहमीच अन्याय, अत्याचार होताना आपण बघत असतो. बरेचदा अनेक स्त्रिया, मुलींना वाटई प्रवृत्तीच्या लोकाकडून अपमानित व्हावे लागते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमजोर होऊन त्या हताश होतात. स्त्रियांनी निरोगी, स्वस्त व स्वाभीमानी जीवन जगण्याकरिता वुशू सारख्या कलात्मक खेळ आत्मसात करुन स्वतःचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याचे मत मोहनबाबु अग्रवाल यांनी व्यक्त केले. ते सेवाग्राम येथील चरखा सभागृहात नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप 2025 च्या उद्घाटन प्रसंगी कल्याणी मंगेश भोंगाडे हिला सन्मानीत करताना बोलत होते. नुकतेच ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन च्या मान्यतेने आयोजित 22 वी राज्यस्तरीय सीनियर महिला व पुरुष वूशू अजिंक्यपद स्पर्धा 2025 जिल्हा नांदेड येथे यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.
या स्पर्धेत वर्धेची खेळाडू कल्याणी मंगेश भोंगाडे यांनी आपल्या उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करीत राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करीत जिल्ह्याचे नाव उंचावल्याबद्दल नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिपच्या उद्घाटनाप्रसंगी सत्कार व सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सेवाग्राम पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अनुपमा गुप्ता, स्पोर्ट कराटे असोशिमशन वर्धेचे संरक्षक इमरान राही, सावंगी ऑथोपेडिक्स विभागाचे डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. दिलीप गुप्ता, नितीन नगराळे, कविता भगत, शिहान शेख दत्तू, शिहान क्रिष्णा ढोबळे, सेन्साई पराग पाटील आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. कल्याणी भोंगाडे हीचे सतीश ईखार, संतोष सेलुकर, मोहन मोहीते, हरिष पाटील, विजय सत्याम, खेमराज ढोबळे हेमलताताई काळबांडे, सचीन झाडे, निखिल सातपुते, प्रविण पेठे, सुनील चंदनखेडे, उमेश चौधरी, गंगाधरजी पाटील, भगवानदास आहुजा, प्रकाश खंडार, श्याम पटवा, संदिप वरकट, सेन्साई सुशांत जिवतोडे आदी अनेकांनी अभिनंदन केले आहे.
कल्याणी भोंगाडे यांनी आपल्या यशाचे श्रेय वर्धा जिल्हा वुशू असोसिएशनचे अध्यक्ष तथा प्रशिक्षक निलेश राऊत व मार्गदर्शक शिहान मंगेश भोंगाडे यांना दिले