आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या सत्कार प्रसंगी बैलबंडीतून काढण्यात आली मिरवणूक

Tue 21-Jan-2025,03:49 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : आ.सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार प्रसंगी बैलबंडीतून मिरवणूक काढण्यात आली.प्रसंग होता विसापूर येथे रविवार १९ जानेवारीला भारतीय जनता पार्टी व संदीप पोडे मित्र परिवारांनी सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांच्या विसापूर येथे जाहीर सत्कार कार्यक्रम चे आयोजन केले होते. या सत्कार प्रसंगी तत्पूर्वी त्यांची आरस केलेल्या बैलबंडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे बालपणी वडिलांचे बोट धरून बैलबंडीची सवारी करत असल्याची आठवण झाली व विसापूरकरांचा हा अनोखा सत्कार मी नेहमीच आठवणीत ठेवणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आ.सुधीर मुनगंटीवार यांचा भारतीय जनता पार्टी व संदीप पोडे मित्रपरिवाराने जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी बैलबंडीतून त्यांची स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा भव्य सत्कार केला या प्रसंगी मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासाचा कामाचा पाढा वाचला. कौशल्यपूर्ण शिक्षण लाडक्या बहिणींना मिळाले पाहिजे. यासाठी एसएनडीटी विद्यापीठ, बल्लारपूर तालुक्यात आणले असे त्यांनी म्हंटले.भाजपा युवा मोर्चा महामंत्री संदीप पोडे यांनी प्रास्ताविकेतून विसापूर फाट्यावर प्रवेशद्वार मिळावा म्हणून मागणी केली. त्यावर व येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, विसापुरतील महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची रंगरंगोटी करावी यासाठी निधी उपलब्ध करून देवू असे आश्वासन दिले.यावेळी मंचावर बल्लारपूर तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार,कार्यक्रमाचे आयोजक संदीप पोडे व मित्रपरिवार,सरपंच वर्षा कुळमेथे,भाजपा सरचिटणीस विद्या देवाळकर,भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस अजय दुबे,भारत जीवने,विसापूर भाजपा अध्यक्ष गणेश टोंगे,अजय दुबे,ज्युनिअर शाहरुख खान राजू रहिकवर,ज्युनिअर सलमान खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.