शिवीगाळ आणि अश्लील वर्तन प्रकरणात तीन आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त

Tue 10-Dec-2024,03:03 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदिर बक्श ( हिंगणघाट )

 

हिंगनघाट- स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल एका प्रकरणात तीन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. हे प्रकरण एका महिलेच्या तक्रारीवर आधारित होते, ज्यामध्ये तिने आरोप केला होता की तिच्या शेजारी राहणाऱ्या आनंद देवराव रणदीवे अरुण पंढरीनाथ पिरके आणि वर्षा अरुण पिरके यांनी तिच्यासोबत शिवीगाळ केली, अश्लील इशारे केले आणि तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 294 (अश्लील कृत्ये आणि शिवीगाळ), कलम 504 (जाणीवपूर्वक अपमान करणे), कलम 509 (महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे), आणि कलम 34 (सामूहिक गुन्हा) अंतर्गत गुन्हा क्रमांक 72/2018 दाखल केला. सखोल तपासानंतर पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात दोषारोप पत्र तयार करून न्यायालयात सादर केले.

हे प्रकरण नियमित फौजदारी प्रकरण क्रमांक 168/2018 म्हणून न्यायालयात प्रविष्ट झाले. फिर्यादी पक्षाने आपल्या बाजूने 5 साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर सादर केल्या आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. फिर्यादी पक्षाने असा दावा केला की आरोपींनी पूर्वनियोजित पद्धतीने पीडितेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला.

आरोपींच्या वतीने प्रसिद्ध वकील अँडव्होकेट इब्राहिम हबीब बख्श यांनी पैरवी आणि युक्तिवाद केला. त्यांनी साक्षीदारांची उलटतपासणी करत न्यायालयासमोर असा युक्तिवाद मांडला की फिर्यादी पक्षाने सादर केलेल्या साक्षी आणि पुरावे संशयास्पद व अपूर्ण आहे.

दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आणि पुरावे विचारात घेतल्यानंतर विद्वान न्यायाधीश पेढे मॅडम यांनी असे निरीक्षण नोंदवले की फिर्यादी पक्ष आरोप शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला आहे. याच आधारावर न्यायालयाने आनंद देवराव रणदीवे अरुण पंढरीनाथ पिरके आणि वर्षा अरुण पिरके यांना निर्दोष मानत मुक्त केले.

या प्रकरणात अँडव्होकेट इब्राहिम बख्श यांनी प्रभावी युक्तिवाद केला, ज्यामध्ये त्यांना अँडव्होकेट अस्मिता खानेकर मुंगल, अँडव्होकेट राहत सादिक पटेल, आणि अँडव्होकेट अश्विनी तपासे यांचे महत्त्वाचे सहकार्य प्राप्त झाले.