वर्धा शहर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी,चेंगळ जुगारावर केली कारवाई
अरबाज पठाण ( वर्धा )
वर्धा शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार हे पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणे करता खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरमार्फत खात्रीशीर खबर मिळाली की काही इसम सार्वजनिक ठिकाणी बोरगाव मेघे येथील पाण्याच्या टाकीजवळ पैशाचे हारजीत करिता चेंगळ जुगार खेळत आहे अशा माहितीवरून तिथे जाऊन दोन पंचा समक्ष चेंगड जुगारावर धाड टाकली असता आरोपी 1) कोहिनूर संजय उके वय 24 वर्ष राहणार गौरी नगर सावंगी मेघे 2) राहुल सुभाष मालखेडे वय 35 वर्ष राहणार संत ज्ञानेश्वर नगर मसाळा 3) संदीप अशोकराव पुसाटे वय 40 वर्षे राहणार कृष्ण मंदिर जवळ पिपरी मेघे 4) पवन छत्रपती कुसळे वय 18 वर्ष राहणार शांतीनगर वर्धा 5) अंकित किसनाजी बरे वय वीस वर्ष राहणार बोरगाव मेघे हे पैसे हारजीत चा चेंगळ जुगार खेळताना रंगहाथ मिळून आले, चेंगड जुगार डावावरून, सर्व आरोपीच्या ताब्यातून तसेच अंगझाडतीतून 1) नगदी 11900 रुपये, 2) पाच वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल किंमत 113000 रुपये 3)एक मोपेड होंडा एक्टिवा व एक बजाज पल्सर किंमत 2,00,000 रुपये 4)52 तास पत्ते किंमत 100 रुपये 5) चेंगळ जुगार बॅनर किंमत 200 रुपये बोरगाव असा एकूण जुमला किंमत 3,25,000 रुपये चा माल मुक्का जप्ती पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पराग पोटे यांच्या निर्देशाप्रमाणे सपोनी विकास गायकवाड पोहावा शैलेश चापलेकर , विजय पंचटिके , प्रशांत वंजारी, पोलीस नाईक पवन लव्हाळे, नरेंद्र कांबळे,पोलीस शिपाई श्रावण पवार, वैभव जाधव, नंदू धुर्वे, शिवा डोईफोडे,योगेश ब्राह्मण, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली आहे.