बंदुक व चार काडतुससह रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : बंदुक व चार जिवंत काडतुस सह पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या. राकेश चंद्रय्या माटला (२८ ) रा. तिलकनगर, अमराई वॉर्ड, घुग्घुस ता. जि.चंद्रपूर असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ४ डिसेंबर ला पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना राकेश चंद्रव्या माटला हा अग्निशस्त्र व जिवंत काडतूस बाळगून घुग्घुसच्या दिशेने वाहनाने जाणार असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली हद्दीतील मुख्य चौकात नाकाबंदी करून सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टलसहित चार जिवंत काडतूस जप्त करून आरोपींविरुद्ध पोस्टे पडोली येथे गुन्हा नोंद करण्यात आले.सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलिस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,पोहवा.किशोर वैरागडे,पोहवा.नितेश महात्मे पोहवा.दिपक डोंगरे,पोहवा.सतिश अवथरे,पोहवा.रजनिकांत पुठठावार, नापोशि.संतोष येलपुलवार,पोशि. गोपाल आतकउलवआर,पोशि. गोपिनाथ नरोटे,चापोहवा. दिनेश अराडे यांनी केली आहे.