अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू

Tue 21-Jan-2025,11:05 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी विलास लभाने गिरड 

गिरड:गिरड वरून पाच किलोमीटर अंतरावर धोंडगाव गावाजवळ वाघीण रोड क्रॉस करत असताना वाघिणीचा बछडा मागे राहिला व वेगात असलेला अज्ञात वाहन बछड्याला चिरडून वाहनाने पलायन केले, गेल्या काही महिन्यापासून वाघिणी आपल्या तीन बछड्यासह, गिरड मोहगाव आर्वी शिवण फळ अंतरगाव पिपरी पिंपळगाव वडगाव सावंगी हिवरा पाईक मारी खुरसापार शिवारामध्ये आढळून आली काही शेतकऱ्यांच्या जनावरावर हल्ला करून ठार मारले तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात शेतकऱ्यांनी वनविभागाकडे चौकशी करून शेतकऱ्यांच्या जनावराचा योग्य तो मोबदला मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी वनविभागांना निवेदन सादर केले आहे वाघिणी आपल्या पिलासह राहते जंगलामध्ये दुसरे वाघ असल्यामुळे वाघ पिलांवर हल्ला करून ठार केल्याशिवाय राहणार नाही या भीतीपोटी वाघिणी आपल्या पिल्लांना घेऊन शेत शिवारात आपला ठिय्या मांडून बसत असते जंगलात मोठ्या प्रमाणात वाघ असल्यामुळे आपल्या पिलांचे रक्षण करण्याकरिता ती गाव शिवाराच्या जवळपास राहते अशातच धोंडगाव जवळील रोड ओलांडताना वाघिणीचा एक पिल्लू मागे राहायला यात पहाटेच्या सुमारास सुमारे चार वाजता अज्ञात वाहनाने रोड क्रॉस करत असताना चिरडले व वाहन फरार झाले सकाळी वनविभागाच्या वतीने पिलांना उचलून वनविभाग कार्यालय गिरड येथे आणून त्यांचा पंचनामा केला त्यानंतर त्यांचा अंत्यविधी सुद्धा करण्यात आला वनविभागाने चेतावणी देऊन वाघिणी आक्रोश झाल्याचे सांगितले त्यामुळे धोंडगाव भवानपूर गिरड अंतर्गत या शिवारातील लोकांनी आज दिनांक 22 1 2025 ला कोणीही शेतावर मजूर वर्ग घेऊन जाऊ नये वाघिणीला पिल्लू न दिसल्यामुळे ती चिडलेली आहे व केव्हाही कुणावरही अटॅक करू शकते असे वनविभाग व पोलीस अधिकारी यांनी कळविले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर जाताना काळजी घ्यावी,असे वनविभाग व पोलीस यंत्रणेने कळविले आहे,