दुचाकीची कट लागल्याच्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : दुचाकीची कट लागल्याच्या वादातून ३ जानेवारी रोजी तन्मय जावेद शेख यांची दगडाने ठेचुन हत्या केली होती .त्याची शाही वाळत नाही तेच काल १२ जानेवारी ला कट लागल्याच्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.त्यात दोन जण जखमी झाल्याची घटना चंद्रपूरात घडली.जटपुरा गेटकडुन गांधी चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकी चालकाने कट मारले . यावरुन वाद झाल्यानंतर कट मारणारी दोन जणांवर धारधार शस्त्राने वार करून दोघांना जखमी केले.ही घटना गिरणार चौकात १२ जानेवारी ला रात्री १०- ३० वाजता घडली शहर पोलिसांनी हल्लेखोर आकाश येलेवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर साहिल चंद शेख (३३) रा. इंदिरा नगर पंचशील चौक चंद्रपूर हा त्याचा मित्र राहुल गजानन वानखेडे (३०) रा. बालाजी वॉर्ड याच्यासोबत त्यांच्या दुचाकीने गांधी चौकाकडे जात असताना आकाश सुधाकर येलेवार, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर हे गांधी चौकाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीने कट मारले. साहिलने त्याला अडवल्यावर त्याने शिवीगाळ केली. यावरून त्यांच्यात वाद झाला असता आकाशने साहिलच्या पोटावर व डाव्या खांद्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. राहुल त्याला वाचवण्यासाठी पुढे आला असता त्याच्या पोटावरही वार करण्यात आल्याने दोघेही जखमी झाले. तेथे जमलेल्या जमावाने हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. जखमीचा तक्रारी वरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे शहर पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध कलम ११८ (१), २९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक गुरनुले तपास करत आहेत.