पोलीस पथका कडुन बिअर व देशी दारूचा माल जप्त
अरबाज पठाण ( वर्धा )
सिंदी रेल्वे : पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे येथील पथकाने आज दिनांक 9/1/2025 रोजी खास मुखबिर कडुन माहीती मिळालेल्या खबरे वरून सेलडोह गावाचे जवळील चौरस्ता येथे नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता नमुद महिला आरोपी नामे श्रीमती राखी मधु कंजरभाट वय 55 वर्ष रा. रा. इतवारा बाजार कंजरमोहल्ला वर्धा ही नागपुर जिल्हयातुन श्री. बालाजी टॅव्हल्स क्र. एम.एच. 34/ए.बि/8386 मध्ये दोन वेगवेगळ्या बॅग मध्ये 1) टैंगो पंच कंपनिच्या देशी दारूने भरून असलेल्या 90 एम.एल.च्या सिलबंद प्लास्टीक च्या 100 नग बॉटल प्रति नग 75रू प्रमाणे 7500रू 2) हॅव्डर्स 5000 कंपनिच्या टिन बिअर 500 एम.एल. च्या 24 नग प्रति नग 250रू प्रमाणे 6000 रू 3) एक मेंहदी व एक काळ्या रंगाची बॅग प्रति बॅग किंमत 300 रू प्रमाणे 600रू असा एकुण जुमला किंमत 14,100रू चा माल वर्धा येथे घेवुन जातांणा रंगेहात मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही प्रमाणे संपूर्ण माल जप्त करून महिला आरोपी विरूध्द अपराध क्रमांक 03/2025 कलम 65,ई, 77 अ, महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे सा, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, प्रमोद मकेश्वर सा. याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरिक्षक संतोष दरेकर पो.स्टे सिंदी रेल्वे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार आनंद भस्मे, प्रफुल डफ, पो.शि. कांचन चाफले, उमेश खामनकर, नितीन नखाते, समीर आगे, प्रगती वाघमारे सर्व नेमणुक पो.स्टे. सिंदी रेल्वे यांनी केलेली आहे