मालगाडीच्या धडकेने रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

Wed 08-Jan-2025,09:16 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याला मालगाडीची धडक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास घडली. बालाजी भानुदास कोटावार (५०) असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे.बालाजी कोटावार रा. डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर हे रेल्वे मधील एस अँड टी विभागात कार्यरत असून ते आज सकाळी ७.३० ते ८ वाजता आपली कामगिरी बजावत असताना फलाट क्रं. ५ मध्ये काझीपेठ एंड कडे त्यांना मालगाडीची धडक बसली. त्यात त्यांचे पाय कटून तीव्र रक्त स्त्राव झाले.त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. पुढील तपास बल्लारशाह रेल्वे पोलिस चौकी चे पोलिस हवालदार धीरज घरडे,पोशि राजेंद्र फटिंग करीत आहे.