पोलीस पथकाची अवैध धंद्यावर व दारुबंदी विरोधात धडक कार्यवाही

Wed 08-Jan-2025,03:19 AM IST -07:00
Beach Activities

आसीफ मलनस ( हिंगणघाट )

 

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, हिंगणघाट यांचा पथकाला पो.स्टे. गिरड हद्दीत अवैध धंद्यांवर कार्यवाही करिता पेट्रोलींग करीत असतांना एक सिल्वर कलर ची चार चाकी मारुती सुझुकी 800 गाडी क्र MH 34 AA 5029 ही देशी व विदेशी दारू ची मौजा कुडसंगी कडून मौजा कोरा कडे वाहतूक करून येत आहे असे गुप्त बातमीदाराचे मिळालेल्या विश्वसनीय खबरेवरुन उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयातील पथकाने सदर ठिकानी जावुन नाकेबंदी केली असता खबरेप्रमाणे एक सिल्वर कलर ची मारुती सुजूकी 800 गाडी क्र. एम एच 34 AA 5029 हे येतांना दिसली तिला पंच व पो स्टाफचे मदतीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर गाडी थोड्या अंतरावर जाऊन थांबली पोलीस स्टाफ व पंच गाडीच्या दिशेने जात असता गाडी चालक हा गाडी सोडून पळून गेला सदर गाडीची पाहणी केली असता गाडीच्या मागील सीट वर 13 खर्डाच्या खोक्यात रॉकेट संत्रा देशी दारू व रॉयल स्टॅग विदेशी दारू चा माल गाडी सह एकुण जु.किं. 2,64,400/- रु.चा माल मिळुन आल्याने आरोपी MH 34 AA 5029 चा चालका विरुध्द पोलीस स्टेशन, गिरड येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा. श्री अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे सा. यांचे मार्गदर्शनात रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पो.हवा. नरेंद्र डहाके, पो. हवा. अश्वीन सुखदेवे, पो.शि आकाश कांबळे ,पो. शी. राकेश ईतवारे , यांनी केली.