३४ नायलॉन मांजा विक्रेत्यांवर ३ दिवसाची तडीपार कारवाई राज्यातील पहिलीच कारवाई

Tue 14-Jan-2025,06:13 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

चंद्रपूर : नायलॉन मांजामुळे पक्षयांसह मानवी जिवितास हानी होत आहे त्यामुळे शासनाने मांजावर बंदी घातली आहे . दरम्यान जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आलेल्या पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी ३४ विक्रेत्यावर तडीपारीची कारवाई केली.राज्यातिल ही पहिलीच कारवाई असल्याने जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. पर्यावरणपुरक धागा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हात पोलिस विभागाकडून अधीसुचना जारी करण्यात आली.या अधिसुचनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलिस स्टेशनस्तरावर जनजागृती करण्यात येत आहे.याशिवाय नायलॉन मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथक तयार करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर हद्दीतील १९, पोलीस स्टेशन रामनगर येथील ८, पोलीस स्टेशन घुग्घूस येथील २, दुर्गापूर येथील ४ व मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका विक्रेत्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (२) अन्वये १३ ते १५ जानेवारीपर्यंत तीन दिवसांकरिता तालुक्यातून तडीपार केले आहेत. आगामी सण,उत्सव अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रभावती एकुरके, रामनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार आसिफराजा शेख, घुग्गुस पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्याम सोनटक्के, दुर्गापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार लता वाढीवे व मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुमित परतेकी यांनी करून विक्रेत्यांना तालुक्यातून तडीपार केले आहेत.