आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह हिंगणघाट येथे विदयार्थ्यांना मार्गदर्शन
नदीम शेख ( वर्धा )
हिंगणघाट : प्रेरणादायी कार्यक्रमाअंतर्गत तज्ञाचे मार्गदर्शन वस्तीगृहात आयोजित करण्यात आले।
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृहाचे गृहपाल आणि कार्यक्रर्माचे अध्यक्ष एस.वि थेटे ,यांनी केले या कार्यक्रमात आरोग्यासंबधित विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी प्रमुख मार्गदर्शक द ड्रीम जिम चे प्रशिक्षक व संचालक इमरान पठान यांनी विदयार्थ्यांना स्वस्थ्य आणि निरोगी राहण्या करीता अनेक उपाय सांगितले, विद्यार्थ्याने सकाळी लवकर उठून व्यायामाने आपल्या दिवसाची सुरवात केली पाहिजे, बाहेर मिळणारे खाद्य पदार्थ खाणे टाळले पाहिजे आणि आपला आहार साधा व शरीरा साठी पौष्टीक राहिला पाहिजे यामुळे तुम्हाला कोणता ही आजार होणार नाही तसेच आळस झटकुन जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरताज़ पंधरे या विद्यार्थ्याने केले तसेच आभारप्रदर्शन शुभम नैताम या विद्यार्थ्याने केले या कार्यक्रमाला कर्मचारी पी. एस. नखाते,अक्षय रणदिवे आणि वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते।